ब्रेड क्रम्स उपमा (bread crums upma recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#GA4 #week5
# 2_3 दिवसांपासून फ्रिजमध्ये सॅंडविच ब्रेड पडल्या होत्या. आणि त्याचे काही करायला वेळ नव्हता. त्याचे काय करायचं असा प्रश्न आल्यावर आणि आठवड्याची थीम बघितल्यावर, शिल्लक असलेल्या ब्रेड पासून उपमा करायचे ठरवले आणि मस्तपैकी उपमा तयार झाला...

ब्रेड क्रम्स उपमा (bread crums upma recipe in marathi)

#GA4 #week5
# 2_3 दिवसांपासून फ्रिजमध्ये सॅंडविच ब्रेड पडल्या होत्या. आणि त्याचे काही करायला वेळ नव्हता. त्याचे काय करायचं असा प्रश्न आल्यावर आणि आठवड्याची थीम बघितल्यावर, शिल्लक असलेल्या ब्रेड पासून उपमा करायचे ठरवले आणि मस्तपैकी उपमा तयार झाला...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 6सॅंडविच ब्रेड
  2. 1कांदा चिरून
  3. 3-4हिरव्या मिरच्या चिरून
  4. 10-12पाने कढीलिंब
  5. 1/2 गाजर चिरून
  6. 2 टेबलस्पूनशेंगदाणे
  7. 1 टेबलस्पूनउडीद साल काढून
  8. चवीनुसार तिखट
  9. चवीनुसार मीठ
  10. 1/2 टीस्पूनसाखर
  11. 3 टेबलस्पूनतेल
  12. 1 टीस्पूनजिरे-मोहरी
  13. 1 टेबलस्पूनथोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली
  14. 1/2लिंबाचा रस
  15. 1/2 टीस्पूनहळद

कुकिंग सूचना

10 मिनिट
  1. 1

    ब्रेड मिक्सर मधून बारीक करून घ्या. कांदा, मिरची, गाजर चिरून घ्यावे.

  2. 2

    गॅस सुरू करून गॅसवर पॅन ठेवून, त्यामध्ये तीन टेबलस्पून तेल टाकावे. तेल गरम झाल्यावर जिरे मोहरी टाकावी व त्यानंतर कांदा, मिरची, गोड लिंबाचा पाला, गाजर, शेंगदाणे आणि उडीद टाकून चांगले परतून घ्यावे. परतल्यानंतर त्यात चवीनुसार तिखट, हळद टाकावी व नंतर मिक्स केल्यावर ब्रेडक्रम्स टाकावे.

  3. 3

    ब्रेडक्रम्स चांगले मिक्स करून घेऊन त्यात मीठ चवीनुसार आणि साखर टाकावी व एक मिनिट झाकण ठेवून वाफ काढावी. आता त्यात अर्धे लिंबू पिळून घ्यावे व कोथिंबीर घालावी.

  4. 4

    अशाप्रकारे झटपट आणि चटपटीत ब्रेडक्रम्स चा उपमा गरमागरम खाण्यास तयार आहे. हा उपमा मी मोकळा केला आहे. आपणास वाटल्यास आपण पाण्याचा शिडकावा देऊ शकतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

Similar Recipes