व्हेज मोमोज(veg momos recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#goldenapron3 23rd week momo ह्या की वर्ड साठी व्हेज मोमोज केले. माझ्या मुलांना मोमोज खूपचं आवडतात. मोमोज सोबत दोन डीप्स केले.बच्चे कंपनी खुश.

व्हेज मोमोज(veg momos recipe in marathi)

#goldenapron3 23rd week momo ह्या की वर्ड साठी व्हेज मोमोज केले. माझ्या मुलांना मोमोज खूपचं आवडतात. मोमोज सोबत दोन डीप्स केले.बच्चे कंपनी खुश.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ ते १ तास
२-३
  1. पारी...
  2. 1 (1/2 कप)मैदा
  3. 1/2 कपपाणी अंदाजे
  4. 1/4 टीस्पूनमीठ...चवीनुसार कमी जास्त
  5. 1/4 टीस्पूनतेल..वरून लावण्यासाठी
  6. सारण
  7. 1/2 कपचिरलेला कोबी
  8. 1/2 कपचिरलेला कांदा
  9. 1/2 कपचिरलेली शिमला मिरची
  10. 1 टेबलस्पूनतेल
  11. 4-5पाकळ्या लसूण
  12. 2हिरव्या मिरच्या
  13. 1/4 टीस्पूनमीठ...चवीनुसार कमी जास्त
  14. 1 टीस्पूनसोया सॉस
  15. 1 टीस्पूनशेजवान चटणी
  16. 1 टीस्पूनव्हिनेगर
  17. डीप १.
  18. 2टोमॅटो
  19. 2लाल मिरच्या
  20. 4-5लसूण पाकळ्या
  21. 1/4 टीस्पूनमीठ
  22. 1/२ टीस्पून साखर
  23. 1 टीस्पूनव्हिनेगर
  24. 1/2 टीस्पूनसोया सॉस
  25. 1/4 कपपाणी
  26. डीप २..
  27. 1/4 कपदही
  28. चिमूटभरमीठ
  29. 1/4 टीस्पूनओरेगानो
  30. 1/4 टीस्पूनचिली फ्लेक्स

कुकिंग सूचना

१/२ ते १ तास
  1. 1

    प्रथम पारीसाठी आटा भिजवला.मैदा, पाणी,मीठ घालून आटा भिजवला वरून तेलाचा हात फिरवून, दहा,पंधरा मिनिटे झाकून ठेवला.

  2. 2

    सारण बनवण्यासाठी भाज्या चिरून घेतल्या.पॅन मध्ये तेल घालून त्यात लसूण,मिरची घालून परतले.मग चिरल्या भाज्या घातल्या.

  3. 3

    मोठ्या आचेवर हे सर्व केले.भाज्या परतल्यावर त्यात मीठ,शेजवान चटणी,सोया सॉस,व्हिनेगर घालून परतले.मिश्रण गार करून घेतले.

  4. 4

    आट्याची पातळ पोळी लाटून घेतली.त्यावर मधोमध गार केलेले सारण घालुन करंजीप्रमाणे फोल्ड केले.कडा पाणी लावून चिकटवल्या.नंतर करंजी मधोमध दुमडून मोमोज चा आकार दिला.एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवले.त्यावर चाळणी ठेवली तिला तेल लावून घेतले.त्यावर तयार मोमोज ठेवून २० मिनीटे मोठ्या आचेवर झाकण ठेऊन वाफवले.

  5. 5

    सगळे मोमोज अशा पद्धतीने वाफवून घेतले.

  6. 6

    डीप१..तयार करण्यासाठी साहित्य घेतले. टोमॅटो आणि लाल मिरची गरम पाण्यात उकळून घेतले.टोमॅटोची साल काढून टाकली.गार झाल्यावर टोमॅटो,मिरची,लसूण पाकळ्या मिक्सरमधून वाटून घेतले.

  7. 7

    पॅन मध्ये तेल घालून त्यात वरील मिश्रण आणि बाकीचे साहित्य घालून मिक्स करून,झाकण ठेऊन शिजवून घेतले.

  8. 8

    डीप २..तयार करताना वर लिहीलेले साहित्य नीट मिक्स करून घेतले.अशा प्रकारे मोमोज आणि डीप्स तयार झाले.गरम गरम मोमोज डीप्स सोबत सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes