मुगाचे कण्ण (कढण) (moongache kan recipe in marathi)

रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज)
रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) @cook_24497459
गोवा

#रेसिपीबुक #week3 आषाढी एकादशी च्या निमित्ताने मुगाचे कढण बनवले. गोव्यात बनणारी एक गोड खीरी चा पदार्थ. गोव्यात अनेक देवळातील जत्रेत हे कण्ण प्यायला मिळते

मुगाचे कण्ण (कढण) (moongache kan recipe in marathi)

#रेसिपीबुक #week3 आषाढी एकादशी च्या निमित्ताने मुगाचे कढण बनवले. गोव्यात बनणारी एक गोड खीरी चा पदार्थ. गोव्यात अनेक देवळातील जत्रेत हे कण्ण प्यायला मिळते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मिनीटे
  1. 1 कपहिरवे मुग
  2. 1 कपनारळाचे दुध
  3. 1/2 कपसाबुदाणा
  4. 1 कपगुळ
  5. 1 टेबलस्पुनवेलची पावडर
  6. 2 टेबलस्पुनकाजू चे तुकडे

कुकिंग सूचना

२५ मिनीटे
  1. 1

    हिरवे मुग निवडुन गरम पातेल्यात कोरडे भाजुन घ्यावे. थंड करुन मिक्सरमधुन कोरडी जाड भरड करावी. साबुदाणा2-3 तास पाण्यात भिजवावा.

  2. 2

    गॅस वर मंद आचेवर पातेल ठेवुन तुप गरम करावे. त्यात मुगाची भरड घालुन भाजावी. 1 कप पाणी घालुन मुग शिजवावे

  3. 3

    मुग शिजत आलेकि त्यात साबुदाणा घालुन शिजवावे.

  4. 4

    एक उकळी आली कि त्यात गुळ, नारळाचे दुध घालुन उकळी आणावी. गुळ विरघळु द्यावा

  5. 5

    गुळ विरघळला कि त्यात वेलची पुड व काजुचे तुकडे घालावेत.सर्व एकदा मिक्स करावे. हे मुगाचे कण्ण जास्त दाट न करता पातळ करुन ग्लास मध्ये पण पीतात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज)
रोजी
गोवा
रजनी शिगांंवकर हि माझी आई . तिने बनवलेल्या रेसिपी पोस्ट करणार आहे. खास तिच्या जेवण बनवण्याच्या आवडीसाठि हा प्रोफईल बनवला आहे.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes