मिनी पिज्जा (mini pizza recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962

#बटरचीज बाहेरचा ऑडर चा पिज्जा नेहमीच खातो पण मी आज लॉकडाऊन काळात घरात असलेल्या साहित्या पासुन लहान बच्चे कंपनीसाठी फसवा पिज्जा झटपट कसा बनवायचा ते दाखवते चला तर

मिनी पिज्जा (mini pizza recipe in marathi)

#बटरचीज बाहेरचा ऑडर चा पिज्जा नेहमीच खातो पण मी आज लॉकडाऊन काळात घरात असलेल्या साहित्या पासुन लहान बच्चे कंपनीसाठी फसवा पिज्जा झटपट कसा बनवायचा ते दाखवते चला तर

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
१-२
  1. ५० ग्रॅम मैदा
  2. ३० ग्रॉम बेसन पिठ
  3. 2टोमॉटो
  4. 1कांदा
  5. 1सिमला मिरची
  6. 1-2 टेबलस्पुनहिरवे ऑलिव्ह
  7. 2चिज क्युब
  8. 1चिज स्लाइज
  9. 1 टेबलस्पुनचिलिफ्लेक्स
  10. 1/2 टिस्पुनमिरपुड
  11. 1 टेबलस्पुनऑरेगॉनो
  12. 1-2 टेबलस्पुनबटर
  13. चविनुसारमिठ

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    टोमॅटो च्या पातळ गोल चकत्या करून ठेवा कांदा उभा पातळ चिरून ठेवा सिमला मिरचीचे बारीक तुकडे करा ऑलिव्ह चेही गोल तुकडे करून ठेवा

  2. 2

    मैदा व बेसनाचे मिठ टाकुन घट्टसर बॅटर बनवा

  3. 3

    छोट्या पॅनमध्ये प्रथम थोडे बटर टाकुन टोमॅटो च्या चकत्या व्यवस्थित लावुन भाजा नंतर उलट्या करून दुसरी बाजु ही थोडी भाजुन घ्या

  4. 4

    त्यावर मैद्याचे बॅटर पसरवा

  5. 5

    त्यावर सिमला मिरचीचे तुकडे कांदा ऑलिव्ह चिलीफ्लेक्स मिरपुड ऑरेगॉनो पसरवा व थोडा वेळाने कडेने बटर टाकुन शिजवा

  6. 6

    नंतर चिज स्लाइजचे हाताने तुकडे करून पिज्जावर पसरवा चिज क्युब वरून किसुन टाका व मंद गॅसवर झाकण ठेवुन चिज मेल्ट होई पर्यत २-४ मिनटे ठेवा आपला मिनि पिज्जा खाण्यास रेडी

  7. 7

    तयार मिनी पिज्जा प्लेट मध्ये सर्व्ह करताना कार्नरचा ऐक पिस कापुन उलटा ठेवा (टोमॅटो स्लाइज ची बाजु) सोबत टोमॅटो सॉस देता येईल

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
रोजी

टिप्पण्या (4)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
धन्यवाद वर्षा ताई , प्रिती , किर्ती 🙏

Similar Recipes