ब्रेड बटाटा कटलेट(bread batata cutlet recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962

#नाष्टा रेसिपी ब्रेडच्या अनेक रेसिपी आपण नेहमीच करत असतो पण मी आज तुम्हाला ब्रेडची हटके रेसिपी कशी करायची ते दाखवते चला तर बघुया

ब्रेड बटाटा कटलेट(bread batata cutlet recipe in marathi)

#नाष्टा रेसिपी ब्रेडच्या अनेक रेसिपी आपण नेहमीच करत असतो पण मी आज तुम्हाला ब्रेडची हटके रेसिपी कशी करायची ते दाखवते चला तर बघुया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास बटाटे शिजवण्यासाठी
२ जणांसाठी
  1. २०० ग्रॅम उकडलेले बटाटे
  2. ८-१० ब्रेडच्या स्लाइज
  3. 2हिरव्या मिरच्या
  4. 1कांदा बारीक चिरलेला
  5. 1 टिस्पुनचिलिफ्लेस
  6. 1 टिस्पुनचाट मसाला
  7. 2-3 टिस्पुनशेजवॉन सॉस
  8. 2 टेबलस्पुनव्हेज मॉयनिज
  9. ५० ग्रॅम मैदा
  10. ३० ग्रॅम ब्रेड क्रम
  11. ५० ग्रॅम तेल
  12. चविनुसारमिठ
  13. 2 टेबलस्पुनकोथिंबीर
  14. 2-3 टेबलस्पुनकिसलेले चिज

कुकिंग सूचना

१/२ तास बटाटे शिजवण्यासाठी
  1. 1

    शिजवलेले बटाटे थंड करून साल काढुन किसुन घ्या व ऐका बाऊल मध्ये घ्या

  2. 2

    किसलेल्या बटाटयात मिरची कांदा चिलिफ्लेक्स चाट मसाला शेजवान सॉस मॉयनिज कोथिंबिर चविनुसार मिठ टाकुन सर्व मिक्स करा (सारण मऊ वाटल्यास १५ मिनटे फ्रिजमध्ये ठेवा)

  3. 3

    ब्रेडची स्लाइज घेऊन कटरने गोल शेप कापुन घ्या व लाटण्याने लाटुन घ्या त्यावर तयार बटाटयाचे सारण पसरवुन त्यावर थोड किसलेले चिज पसरवा व पुर्ण कडांना मैदयाची घट्ट पेस्ट लावुन त्यावर दुसरा गोल शेप ठेवुन हाताने दाब दया

  4. 4

    चिज पसरवल्यावर मैदयाची पेस्ट सर्व बाजुने लावुन दुसरा गोल त्यावर ठेवुन हाताने हलका दाब देऊन बंद करा

  5. 5

    तयार ब्रेड कटलेट मैदयाच्या पातळ बॅटर मध्ये बुडवुन नंतर ब्रेड क्रम मध्ये घोळवा

  6. 6

    नंतर पॅनमधील गरम तेलात कटलेट शॉलो फ्राय करा

  7. 7

    तयार ब्रेड कटलेट डिश मध्ये सर्व्ह करा सोबत टमॉटो केचप किंवा लोणच दही देता येईल

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
रोजी

टिप्पण्या (2)

Similar Recipes