चीजी लझानिया इन पॅन🧀🥘 (cheese lasagna recipe in marathi)

Dipali Kathare
Dipali Kathare @cook_24949351

#बटरचीज
ही रेसिपी इटालियन आहे. पण मी रेसिपीला थोडासा इंडियन टच दिला आहे.लजानिया से शीट्स बाजारामध्ये उपलब्ध असतात.पण सध्या लाॅकडाउन असल्यामुळे मला ते मिळाले नाही म्हणून मीही रेसिपी मैद्याचे शीट बनवून तयार केली आहे .

चीजी लझानिया इन पॅन🧀🥘 (cheese lasagna recipe in marathi)

#बटरचीज
ही रेसिपी इटालियन आहे. पण मी रेसिपीला थोडासा इंडियन टच दिला आहे.लजानिया से शीट्स बाजारामध्ये उपलब्ध असतात.पण सध्या लाॅकडाउन असल्यामुळे मला ते मिळाले नाही म्हणून मीही रेसिपी मैद्याचे शीट बनवून तयार केली आहे .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२ तास
  1. १०० ग्राम मैदा
  2. १०० ग्राम मॉझरेला चीज
  3. ५० ग्राम बटर
  4. 1कांदा
  5. 2मध्यम आकाराचे बटाटे
  6. 8-9बीन्स
  7. 1गाजर
  8. 4-5टोमॅटो
  9. 8-9लसूण पाकळ्या
  10. 3 टेबलस्पून तेल
  11. 2 टीस्पूनचिली फ्लेक्स
  12. 2 टीस्पूनओरिगॅॅनो
  13. 2 टीस्पूनटोमॅटो सॉस
  14. 1 टीस्पूनलाल तिखट पावडर
  15. 1/2टी स्पून हळद
  16. 1 टीस्पूनकाळीमिरी पावडर
  17. 2 कपदूध
  18. कोथिंबीर
  19. मीठ
  20. कोोो

कुकिंग सूचना

२ तास
  1. 1

    या रेसिपीसाठी प्रथम आपण रेड सॉस बनवून घ्यायचा आहे. त्याची रेसिपी पुढीलप्रमाणे ५-६ टोमॅटो घेऊन ते कुकरमध्ये उकडून घ्यायचे आहेत. नंतर ते थंड झाल्यावर त्याची साले काढून मिक्सरमधून फिरवून त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसुन बारीक चिरलेले व कांदा बारीक चिरलेला घालून फ्राय करायचे आहे. मग त्यामध्ये टोमॅटो प्युरी घालायची आहे. थोडावेळ काफ फ्राय केल्यावर त्यामध्ये लाल तिखट पावडर, हळद, ओरेगॅनो, चिली फ्लेक्स, मीठ घालावे.

  2. 2

    हे सर्व मिश्रण पाच ते सात मिनिट फ्राय केल्यावर मग त्यामध्ये २ टेबल स्पून टोमॅटो सॉस घालावा. हा झाला आपला रेड सॉस तयार.

  3. 3

    आता आपण व्हाईट साॅस बनवणार आहोत त्याची कृती पुढीलप्रमाणे पॅनमध्ये एक टेबलस्पून अमूल बटर घालावे. मग त्यामध्ये दोन टेबलस्पून मैदा घालून ते चांगले फ्राय करावे. मग त्यामध्ये दोन कप दूध घालावे. हे मिश्रण व्यवस्थित उकळल्यावर त्यामध्ये दोन ची स्लाईस घालावेत. मग त्यामध्ये काळी मिरी पावडर व मीठ घालावे.

  4. 4

    खरंतर लजानीयाच्या शीट्स मार्केटमध्ये मिळतातत पण मी मैद्याचे बनवले आहे त्याची रेसिपी मी तुम्हाला देत आहे. प्रथम एका बाउल मध्ये मैदा घ्यावा त्यामध्ये दोन टेबलस्पून तेल व मीठ घालून त्याची कणिक मळून घ्यावी. ही कणिक ओल्या कापडाने कव्हर करून वीस मिनिटे बाजूला ठेवावी.

  5. 5

    आता यानंतर कांदा गाजर बटाटा हे सर्व बारीक कट करून घ्यावे. तसेच लसूण बारीक चिरून घ्यावा.मग कढईमध्ये एक टेबलस्पून तेल घालून त्यामध्ये प्रथम बारीक चिरलेला लसूण घालावा त्यामध्ये वन टीस्पून ओरिगानो व चिली फ्लेक्स घालून फ्राय करून घ्यावे. मग त्यामध्ये चिरलेल्या सर्व भाज्या घालून परतून घेणे. नंतर त्यामध्ये चवीपुरते मीठ घालावे

  6. 6

    आता आपण भिजवलेल्या मैद्याचे पीठ घेऊन त्याचे छोटे-छोटे चार गोळे करून घ्यावेत.आपण ज्या पॅन मध्ये लजानीया करणार आहोत त्यांच्या आकाराचे शीट तयार करून घ्यावेत. खाली दिलेल्या फोटो प्रमाणे आपल्याला असे चार शीट करून घ्यायचे आहेत. व हे शीट आपल्याला अर्धा तास पर्यंत फॅन खाली कोरडे होण्यासाठी ठेवायचे आहेत.

  7. 7

    ही झाली आपली या रेसिपी ची पूर्वतयारी रेड सॉस, व्हाईट सॉस, आपण फ्राय केलेल्या भाज्या व चीज.

  8. 8

    आता आपण त्यामध्ये या सर्व गोष्टींचे लेयर देणार आहोत. प्रथम पॅनमध्ये रेड सॉस पसरवून घेणार आहोत मग त्यामध्ये मैद्याचे १ शीट पसरवून घेणार आहोत.मग त्यावर वन टेबल स्पून व्हाईट सॉस व रेड सॉस घालून स्प्रेड करून घेणार आहोत. मग त्यावर व्हेजिटेबल्स घालून नंतर आपल्याला चीज घालायचे आहे. अशा पद्धतीने चारी नीटसं आपल्याला पसरून घ्यायचे आहेत.

  9. 9

    मी फोटोज मध्ये दाखवल्या प्रमाणे सर्व स्टेप्स क्रमाक्रमाने करून घेणे.

  10. 10

    यानंतर आपण पॅन गॅसवर ठेवून गॅस चालू करावा. आपला गॅस मिडीयम फ्लेम वर ठेवून लजानीया वीस मिनिटे शिजू द्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Dipali Kathare
Dipali Kathare @cook_24949351
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes