पनीर पेरी पेरी पिझ्झा (paneer peri peri pizza recipe in marathi)

Ashwini Jadhav
Ashwini Jadhav @cook_24351128
Pune

#रेसिपीबुक #week6
#रेसिपी_2 #चंद्रकोर
#NoOvenBaking
हा पिझ्झा बेस मी नेहा यांच्या रेसिपी नुसार बनवला आहे. माझ्या रेसिपी मध्ये आणखी काही साहित्य मी घालते. त्यानुसार मी नेहमी पिझ्झा करते. माझ्या पिझ्झा ची रेसिपी मी पुन्हा कधीतरी पोस्ट करेनच. तेव्हा नक्की ट्राय करा. 👍🏻😁

पनीर पेरी पेरी पिझ्झा (paneer peri peri pizza recipe in marathi)

#रेसिपीबुक #week6
#रेसिपी_2 #चंद्रकोर
#NoOvenBaking
हा पिझ्झा बेस मी नेहा यांच्या रेसिपी नुसार बनवला आहे. माझ्या रेसिपी मध्ये आणखी काही साहित्य मी घालते. त्यानुसार मी नेहमी पिझ्झा करते. माझ्या पिझ्झा ची रेसिपी मी पुन्हा कधीतरी पोस्ट करेनच. तेव्हा नक्की ट्राय करा. 👍🏻😁

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30-40 मिनिटे
4-5 व्यक्तींसाठी
  1. 🔶️पिझ्झा बेस साठी
  2. 2 कपमैदा
  3. 3/4 कपदही
  4. 1/2 कपकोमट पाणी
  5. 1 टीस्पूनबेकिंग पावडर
  6. 1/2 टीस्पूनबेकिंग सोडा
  7. चवीनुसारमीठ
  8. 2 टेबलस्पूनतेल
  9. 🔶️पिझ्झा टॉपिंग साठी
  10. 1 कपघरी बनवलेला पिझ्झा सॉस
  11. दीडशे ग्रॅम पनीर
  12. 1 टेबल स्पूनआले-लसूण पेस्ट
  13. 1 टीस्पूनरेड चीली पावडर
  14. 1/4 कपलांबट चिरलेली भोपळी मिरची टोमॅटो कांदा प्रत्येकी
  15. 1/2 कपचिरलेला पालक
  16. 1/4 कपस्वीट कॉर्न
  17. 2 टेबल स्पूनब्लॅक ऑलिव्ह
  18. 2 कपमॉझरेला चीज
  19. 1/2 कपप्रोसेस चीज
  20. 1 टेबल स्पूनपिझ्झा ओरेगानो
  21. 1टिस्पून चीली फ्लेक्स
  22. 2 टेबलस्पूनरेगुलर ओरेगानो
  23. 1 टेबल्स्पूनपेरी पेरी स्पाइस मिक्स
  24. 4 टेबलस्पूनबटर
  25. 2 टेबलस्पूनऑलिव्ह ऑइल
  26. 1 कपमक्याचे पीठ लावण्यासाठी

कुकिंग सूचना

30-40 मिनिटे
  1. 1

    सर्वात आधी पिझ्झा बेस बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी दोन कप मैदा मध्ये चवीनुसार मीठ, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा घालून चांगले मिक्स करायचे आणि मध्ये आळी करून त्यात दही आणि तेल आणि कोमट पाणी घालून चांगले मळून घ्यायचे. साधारण 5 मिनिटे एक सारखे मळून घ्यायचे. प्लॅस्टिक पेपरने रॅप करून गरम ठिकाणी ठेवून द्यायचे.

  2. 2

    पनीर ला मॅरीनेशन करण्यासाठी पनीरचे छोटे तुकडे करून घ्यायचे. त्यात आले लसूण पेस्ट, रेड चिली पावडर, चवीपुरते मीठ, चिली फ्लेक्स, पेरी पेरी स्पाईस मिक्स घालून सर्व मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचे. नंतर नॉनस्टिक तव्यावर थोडे ऑलिव ऑइल घालून पनीर थोडे परतून घ्यायचे. थोडे पाणी सुटले तर ते पूर्ण आटवून घ्यायचे.

  3. 3

    आता टॉपिंग साठी चिरलेली ढोबळी मिरची आणि टोमॅटो फुलका भाजायच्या जाळीवर गॅसवर भाजून घ्यायचे

  4. 4

    आता मळलेल्या कणकेचे सहभाग करून घ्यायचे. त्यातला एक गोळा घेऊन मक्याचे पिठात घोळवून त्याची पोळी लाटून घ्यायची आणि त्याची घडी घालायची. घडी घातल्यानंतर त्याला चंद्रकोरीचा आकार द्यायचा.

  5. 5

    आता एका पसरट कढई मध्ये स्टॅन्ड ठेवून त्यावर झाकण ठेवून दहा मिनिटे प्रिहीट करून घ्यायची.आता ही चंद्रकोर आकार दिलेली पोळी मक्याचे पीठ भुरभुरलेल्या प्लेटमध्ये ठेवून द्यायची. त्यावर काट्याच्या चमच्याने मार्क करून घ्यायचे. जेणेकरून पिझ्झा बेस फुटणार नाही. त्यावर थोडे बटर लावून घ्यायचे. त्यानंतर त्यावर होम मेड पिझ्झा सॉस लावुन घ्यायचा. साॅस लावून झाल्यानंतर त्यावर चीज आणि वरील सर्व टॉपिंग घालून घ्यायचे. प्रिहिट केलेल्या कढईमध्ये ठेवायचे आणि साधारण 20 ते 25 मिनिटे मिडीयम-हाय फ्लेमवर पिझ्झा बेक करायचा.

  6. 6

    तयार आपला आहे आपला गरमागरम चंद्रकोर आकारातील पनीर पेरी पेरी पिझ्झा... 😍😍😋😋

  7. 7

    चंद्रकोर आकारा सोबतच मी रेगुलर आपले गोल आकाराचे पिझ्झा बनवले होते. मुलांसाठी चीज पिझ्झा आणि अहोंसाठी विदाऊट ओलिव्ह पिझ्झा... 😁😁

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashwini Jadhav
Ashwini Jadhav @cook_24351128
रोजी
Pune

टिप्पण्या

Similar Recipes