नो ओवन नो ईस्ट सिंनामोन रोल (no yeast cinnamon roll recipe in marathi)

Shweta Amle
Shweta Amle @cook_22142786

#noovenbaking #post2 #cooksnap मी नेहा शहा यांनी शिकवलेली No oven No yeast Cinnamon Roll ही रेसिपी केलेली आहे. खूप छान झाली. काहीतरी नवीन शिकायला मिळाले. धन्यवाद नेहा शहा मॅम🙏😊

नो ओवन नो ईस्ट सिंनामोन रोल (no yeast cinnamon roll recipe in marathi)

#noovenbaking #post2 #cooksnap मी नेहा शहा यांनी शिकवलेली No oven No yeast Cinnamon Roll ही रेसिपी केलेली आहे. खूप छान झाली. काहीतरी नवीन शिकायला मिळाले. धन्यवाद नेहा शहा मॅम🙏😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
6 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपमैदा
  2. 1/4 टीस्पून बेकिंग सोडा
  3. 3/4 टीस्पूनबेकिंग पावडर
  4. 1/4 टीस्पूनमीठ
  5. 2 टेबलस्पूनसाखर
  6. 1/2 वाटीदही
  7. 2 +1/2 टेबलस्पूनवितळलेले बटर
  8. 2 टेबलस्पूनसाखर (ब्राऊन शुगर)
  9. 2 टेबलस्पूनबटर
  10. 1 टीस्पूनदालचिनी पावडर

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    सर्वात आधी मैदा घेऊन वरील प्रमाणानुसार त्यामध्ये बेकिंग सोडा, बेकिंग पावडर,मीठ, दोन टेबलस्पून साखर हे सगळ कोरडं हाताने मिक्स करून घ्यावे. नंतर दह्याने भिजवून त्याला चांगले मळून त्याचा गोळा तयार करून घ्यावा. व दहा मिनिटे झाकून ठेवावा.

  2. 2

    नंतर एका वाटीमध्ये दोन टेबलस्पून साखर,दोन टेबलस्पून बटर व अर्धा किंवा एक टीस्पून दालचिनी पावडर टाकून छान मिक्स करून घ्यावे. दहा मिनिटे झाल्यावर त्या मैद्याच्या गोव्याला आयताकृती आकारात लाटून घ्यावे. मग त्यावर हे वाटीत तयार केलेलं मिश्रण त्या लाटीवर स्प्रेड करून घ्यावे.

  3. 3

    मग त्या स्प्रेड लाटी ला दोन्ही बाजूंनी फोल्ड करून घ्यावे. त्याला बुक फोल्ड असे म्हणतात. एक साईड ने फोल्ड मारली कि परत दूसरी फोल्ड त्याच्यावरती मारावी. मग परत हलक्या हाताने थोडं लाटून घ्यावे. जेणेकरून आत मधलं स्प्रेड केलेल त्याला तिला चिपकेल. मग त्याचे चाकूने सहा भाग करून घ्यावेत.

  4. 4

    मग त्या सहा भागापैकी एका भागाला मधोमध दोन उभे कट करावे व वेणी घालतो त्यानुसार वेणी घालून राउंड शेप मध्ये चिपकून घ्यावे.माझे ते फोटो घ्यायचे राहिले त्यामुळे मी त्यामध्ये टाकलेले नाहीत. असेच प्रत्येक सिनेमॉन रोलचे करून घ्यावे. मग गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये मीठ टाकून स्टॅन्ड ठेवून कढई प्री हिट करायला ठेवून द्यावी. कढई प्री हिट हिट त्यामध्ये एक प्लेट ठेवून हे सिनेमॉन रोल वाट्यांना बटर लावून त्यामध्ये ठेवावे.

  5. 5

    सिनेमॉनरोल बेक करायला ठेवल्यावर त्याआधी त्यांना वरून ब्रशने बटर लावून ग्रीस करून घेणे. व कढईवर झाकण ठेवून 30 मिनिटे मिडीयम आचेवर बेक करून घ्यावेत. बेक झाल्यावर आता आपले सिनेमॉन रोल खाण्यासाठी रेडी आहेत😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shweta Amle
Shweta Amle @cook_22142786
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes