उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)

Ankita Khangar
Ankita Khangar @cook_22672178

#रेसिपीबुक #week10
#मोदक
उकडीचे मोदक हे गणपतीचे सर्व प्रिय.
बनवायला फारच सोपे आणि चवीला तेवढेच उत्तम.
गणपतीचे सण म्हटले की परिवार, मोदक, हास्य, विविध खाद्य हे सर्वच आले.
या वर्षी गणपतीला पहिल्यांदाच मी उकडीचे मोदक याचा नैवेद्य दिला.
आणि मला खात्री आहे की हा नैवेद्य माझ्या बाप्पाला नक्कीच आवडला आहे.
हे मोदक कधीच एकट्याने बनवायचे नसतात तर एकत्र सगळं कुटुंब असावे व एकमेकांसोबत गोष्टी करत हे मोदक बनवावे आणि बघा मग किती गोडवा या मोदकात येणार!!!!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिटे
7 सर्विंग
  1. 1 कपआंबेमोहोर तांदूळ पीठ
  2. 1/2 कपदूध
  3. 1/2 कपपाणी
  4. 1 टीस्पूनतूप
  5. 1 चिमूटमीठ
  6. सारणासाठी
  7. 1 टीस्पूनतूप
  8. 1ओल्या नारळाचा कीस
  9. 1/2 कपसाखर
  10. केशर काड्या

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम एक ओले नारळ घ्यावे व त्याची पाठ काढून त्याचा किस करून घ्यावे.एका पॅनमध्ये तूप घ्यावे व हा कीस त्यात दोन मिनिटे भाजावे.
    भाजून झाल्यानंतर साखर ऍड करावी.

  2. 2

    साखर लगेच विरघळल्यानंतर पाक व्हायच्या आधी गॅस बंद करावे जेणेकरून आपले सारण मोकळेच राहावे.

  3. 3

    बनवलेले सारण थंड होऊ द्यावे.सोबतच एकीकडे दूध पाणी व तूप एकत्र उकळी येऊ द्यावी.उकळी आल्यानंतर त्यात तांदळाचे पीठ व मीठ घालून मिक्स करावे.दोन मिनिटे हलवत राहावे व गॅस बंद करावे.

  4. 4

    हे मिश्रण दहा मिनिटे झाकून ठेवावे.तेलाचा हात घेऊन हे मिश्रण मळून घ्यावे.मिश्रण मऊ झाल्यानंतर एक गोळा हातात घ्यावा व त्याची हातात गोल पाती करून घ्यावी.त्यात एक चमचा सारण भरावे व मोदकाचा आकार देऊन मोदक तयार करावे.पाती व्यवस्थित कव्हर झाली पाहिजे.पाती व्यवस्थित कव्हर नसल्यास सारण बाहेर निघू शकते.

  5. 5

    सर्व मोदक तयार करून घ्यावे.वरून मोदकाला एक केशर काडी लावावी.स्टीमर पात्राला तेल लावून घ्यावे व त्यात हे मोदक ठेवावे.एकीकडे स्टीमर मध्ये पाणी गरम करावे.पाणी गरम झाल्यास स्टीमर पात्र स्टीमर मध्ये ठेवावे.व झाकून घ्यावे.दहा मिनिटे स्टीम मध्ये मोदक शिजू द्यावे.दहा मिनिटानंतर मोदक बाहेर काढावे व गरम गरम तुपासोबत सर्व करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ankita Khangar
Ankita Khangar @cook_22672178
रोजी

Similar Recipes