तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#रेसिपीबुक #week10
बाप्पासाठी अनेक प्रकारचे मोदक मी करते.त्यापैकी एक हमखास संकष्टी चतुर्थीला तळणीचे मोदक करते.

तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)

#रेसिपीबुक #week10
बाप्पासाठी अनेक प्रकारचे मोदक मी करते.त्यापैकी एक हमखास संकष्टी चतुर्थीला तळणीचे मोदक करते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

५-७ मिनीटे
२-३
  1. 1 कपगव्हाचे पीठ
  2. चिमूटभरमीठ
  3. 1 टीस्पूनतेल...मोहन
  4. 1/4 कपपाणी अंदाजे...आवश्यकतेनुसार जास्त घ्यावे
  5. 1/2 कपखवलेले खोबरे
  6. 1/4 कपगूळ
  7. 1 टीस्पूनसाजुक तूप
  8. चिमूटभरवेलची पूड
  9. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

५-७ मिनीटे
  1. 1

    पुर्यांसाठी भिजवतो त्याप्रमाणे घट्ट आटा भिजवून घेतला.गव्हाचे पीठ,चिमूटभर मीठ,,मोहनासाठी तेल आणि पाणी घेऊन आटा भिजवला.दहा मिनिटे झाकून ठेवला.

  2. 2

    खोबरं,गुळ,वेलची,साजुक तूप कढईत घालून छान परतून घेतले.आणि सारण तयार केले.

  3. 3

    तयार आट्याचे छोटे गोळे करून लाटून घेतले.त्यात सारण भरून त्याला मोदकाचा आकार दिला.

  4. 4

    कढईत तेल तापल्यावर त्यात मोदक सोडून,छान सोनेरी रंगावर तळून घेतले.बाप्पाला नैवेद्य दाखवून खाण्यासाठी मोदक तयार आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes