दहीवडे (dahi vada recipe inmarathi)

Kirti Killedar
Kirti Killedar @cook_23097233
गोवा

#फ्राईड दहीवडे हा सर्वानाच आवडतो. रिमझिम पाऊस पडत असताना मस्त चटपटीत दहीवडे खायची मजाच वेगळी
दही मुळे पचनक्रिया पण सुधारते. वड्यावर गोड दही व चाट मसाला एकदम चटपटीत

दहीवडे (dahi vada recipe inmarathi)

#फ्राईड दहीवडे हा सर्वानाच आवडतो. रिमझिम पाऊस पडत असताना मस्त चटपटीत दहीवडे खायची मजाच वेगळी
दही मुळे पचनक्रिया पण सुधारते. वड्यावर गोड दही व चाट मसाला एकदम चटपटीत

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि.
4 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपउडीदाची डाळ
  2. 1 कपमुगाची डाळ
  3. 1 टीस्पूनजीरे
  4. तेल तळण्यासाठी
  5. 1 कपदही
  6. 1 टीस्पूनसााखर
  7. 1 टीस्पूनजीरे पावडर
  8. 1 टीस्पूनमिरी पावडर
  9. 1 कपकोथिंबीर
  10. 1 कपपुदिना
  11. 4-5हिरव्या मिरच्या
  12. 1 इंचआले
  13. 1/2लिंबाचा रस
  14. 1 कपचिंच
  15. 1 टेबलस्पूनगुळ
  16. 1 टेबलस्पूनखजुर
  17. 3 टीस्पूनमीठ
  18. 1 टीस्पूनलाल तिखट
  19. 2 टीस्पूनचाट मसाला

कुकिंग सूचना

30 मि.
  1. 1

    उडीदाची डाळ व मुगाची डाळ रात्री स्वच्छ धुवून भिजत घालून ठेवावी. सकाळी भीजत घातलेले डाळीतले पाणी काढून मिक्सरमधुन वाटुन घ्यावे. थोडेसे पाणी घालून घट्ट वाटुन घ्यावे. नंतर त्यात 1 टीस्पून मीठ व 1 टीस्पून जीरे घालून चांगले मऊसर फेटून घ्यावे. 10 मिनिटे चांगले फेटून घ्यावे.

  2. 2

    कढईत तेल गरम करायला ठेवावे. तेलात चमच्याच्या सहाय्याने भज्यासारखे तेलात वडे सोडावे. मंद गॅसवर तांबुस होई पर्यंत तळून घ्यावे. दुसर्‍या एका बाऊलमध्ये गरम पाणी घालावे. त्यामध्ये तळलेले वडे घालावे व 15 मिनीटे तसेच ठेवावे.

  3. 3

    मिक्सरमध्ये कोथिंबीर, पुदिना, मिरच्या, आले व मीठ घालून एकञ वाटुन घ्यावे. अर्धा लिंबाचा रस घालावा. पातेल्यात पाणी व चिंच घालून चांगले शिजवून घ्यावे. चिंच थंड झाल्यावर खजुर व गुळ एकञ मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. गाळणीतून गाळून घ्यावे. नंतर त्यामध्ये मीठ व जीरे पावडर घालून चांगले मिक्स करावे. चिंचेची चटणी तयार करावी.

  4. 4

    एका बाऊल मध्ये दही घेतले. चमच्याने चांगले फेटून घ्यावे. नंतर त्यामध्ये 1 टीस्पून मीठ, साखर, 1 टीस्पून जीरे पावडर व 1 टीस्पून मिरी पावडर घालून चांगले मिक्स करावे.

  5. 5

    पाण्यात भिजवून ठेवलेले वडा हातात घेऊन हलक्या हाताने दाबून त्याचे पाणी काढून घ्यावे. एका प्लेटमध्ये दोन वडे ठेवावे. त्यावर दह्याचे मिश्रण घालावे. हिरवी चटणी व चिंचेची चटणी घालावे. नतंर वरुन तिखट व चाट मसाला घालावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kirti Killedar
Kirti Killedar @cook_23097233
रोजी
गोवा

टिप्पण्या

Similar Recipes