कचोरी (kachori recipe in marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#रेसिपीबुक #week12
कचोरी
मस्त चटपटीत आंबटगोड कचोरी सगळ्यांनाच खूप आवडते. कधीही पटकन एक, दोन कचोऱ्या तोंडात टाकायला मस्त वाटतात. नेहमीच बाहेरुन आणल्या जातात. पण यावेळी मात्र घरीच बनवल्या. खूपच टेस्टी आणि क्रिस्पी झाल्या, घरचे पण खुष झाले. याची रेसिपी देत आहे.

कचोरी (kachori recipe in marathi)

#रेसिपीबुक #week12
कचोरी
मस्त चटपटीत आंबटगोड कचोरी सगळ्यांनाच खूप आवडते. कधीही पटकन एक, दोन कचोऱ्या तोंडात टाकायला मस्त वाटतात. नेहमीच बाहेरुन आणल्या जातात. पण यावेळी मात्र घरीच बनवल्या. खूपच टेस्टी आणि क्रिस्पी झाल्या, घरचे पण खुष झाले. याची रेसिपी देत आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४५ मिनिटे
४ जणांसाठी
  1. वरील आवरणासाठी
  2. २०० ग्रॅम मैदा
  3. 2 टेबलस्पूनबेसन पीठ
  4. 4 टेबलस्पूनतेल
  5. 1/2 टीस्पूनमीठ
  6. सारणासाठी
  7. २५० ग्रॅम मिक्स फरसाण
  8. 1 टेबलस्पूनमनूका
  9. 2 टीस्पूनतिखट पूड
  10. 1 टी स्पूनधणे
  11. 1 टीस्पूनजिरे
  12. 1 टीस्पूनतिळ
  13. 1/2 टीस्पूनमीठ
  14. 1 टेबलस्पूनचिंच गूळाची चटणी

कुकिंग सूचना

४५ मिनिटे
  1. 1

    मैदा, बेसन पीठ, ओवा, मीठ आणि तेल घालून चांगले मिक्स करावे. त्याचा सुकाच घट्ट मुठभर गोळा झाला की पीठ बरोबर होणार आहे असे समजावे. आणि मग थोडे थोडे पाणी घालून मध्यम घट्टसर पीठ मळून घ्यावे.

  2. 2

    एका पॅन मधे धणे, जिरे आणि तिळ घालून मंद आचेवर सुकेच भाजून मग त्याची पावडर करुन घ्यावी.

  3. 3

    सारणासाठी फरसाण मिक्सर मधून जाडसर वाटून घ्यावे.

  4. 4

    फरसाणच्या जाडसर पावडर मधे वाटलेली धणे, जिरे, तिळाची पावडर, मनूका, तिखट पूड, मीठ आणि चिंचेची चटणी घालून मिक्स करावे पाणी घालू नये. त्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करावे.

  5. 5

    मैद्याच्या गोळ्याची लहान पूरी सारखी पारी लाटून त्यात फरसाणच्या मिश्रणाचा लहान गोळा घालून बंद करुन अलगद हाताने फिरवून गोल करुन त्याची कचोरी बनवावी.

  6. 6

    तेल चांगले गरम झाल्यावर कचोऱ्या तळताना आधी गॅस मध्यम करावा. मग त्यात कचोऱ्या घालून मंद आचेवर तळून घ्याव्या. म्हणजे कचोरी आतून पण चांगली खरपूस तळली जाते. टिश्यू पेपरवर काढून जास्तीचे तेल टिपून घ्यावे.

  7. 7

    अशा प्रकारे सगळ्या कचोऱ्या तळून घ्याव्या. कचोऱ्या गार झाल्यावर एअर टाईट डब्यात भरुन ठेवाव्या, पंधरा दिवस पर्यंत छान खुसखुशीत रहातात. प्रवासात नेण्यासाठी पण बनवून घेऊन जावे.

  8. 8

    घरीच बनवलेल्या छान खुसखुशीत कचोऱ्या खाताना खूप मस्त लागल्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
रोजी

Similar Recipes