मटार कचोरी (Matar kachori recipe in marathi)

Rashmi Joshi
Rashmi Joshi @Rashmij21

ताज्या मटार ची कचोरी मस्त खुसखुशीत, चटपटीत व चवदार होते. नक्की ट्राय करा..

मटार कचोरी (Matar kachori recipe in marathi)

ताज्या मटार ची कचोरी मस्त खुसखुशीत, चटपटीत व चवदार होते. नक्की ट्राय करा..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
3-4 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपमैदा
  2. 1 चमचाकाॅर्न फ्लोअर
  3. 3 टेबलस्पूनतेल
  4. मीठ चवीनुसार
  5. सारणासाठी
  6. 1 कपमटार चे दाणे
  7. 1 टेबलस्पूनआलं लसूण पेस्ट
  8. 1 टीस्पूनमिरची पेस्ट /आवडीनुसार
  9. 1 टीस्पूनजीरे
  10. 1 टीस्पूनधणे जाडसर कुटून
  11. 1 टीस्पूनबडीशोप जाडसर कुटून
  12. मीठ चवीनुसार
  13. थोडी साखर चवीला
  14. 1/2 टीस्पूनलिंबू रस
  15. तेल तळण्यासाठी

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    सर्वप्रथम मैदा भिजवून घ्यावा. त्यासाठी एका वाट्यात मैदा, मीठ, काॅर्न फ्लोअर व तेल घालून नीट पीठाला तेल चोळून घ्यावे आणि पाणी घालून मध्यम घट्ट पीठ भिजवून घ्यावे.

  2. 2

    सारणासाठी मटार चे दाणे मिक्सरमध्ये थोडे जाडसर वाटून घ्यावे. एकदम पेस्ट नाही करायची.एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यात जीरे, आलं लसूण, मिरची पेस्ट घालावी. जाडसर कुटलेले धणे बडीशोप घालून नीट परतून घ्यावे व त्यात बारीक केलेला मटार घालावा.छान परतून एकत्र करावे. मीठ, साखर घालून एक वाफ आणावी. नंतर लिंबू रस घालून सारण गार करून घ्यावे.

  3. 3

    पीठाचे एक सारखे गोळे करून घ्यावे. गोळ्याला वाटी सारखा आकार करून त्यात सारण भरून कचोरी करून घ्यावी. थोडी हाताने थापून घ्यावी.लाटून घेतली तरी चालेल. सगळ्या कचोर्या या प्रमाणे भरून घ्याव्यात.

  4. 4

    कचोरी तळण्यासाठी तेल नेहमी कोमट असावं. मंद आचेवर कचोर्या तळून घ्याव्यात म्हणजे छान खुसखुशीत होतात. तळलेली मिरची, दही, चटणी बरोबर सर्व्ह करावे. तोंडाला पाणी सुटले ना...नक्की करून बघा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rashmi Joshi
Rashmi Joshi @Rashmij21
रोजी
I love cooking and trying new recipes.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes