बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)

Dhanashree Suki Padte
Dhanashree Suki Padte @cook_21625037

#रेसिपीबुक #week12

बाकरवडी नेहमी खायचं काम केलं पण हि थिम खूप छान आहे . कुकपड मुळे पहिल्यान्दा बनवायचा योग्य आला छान झाली आहे नक्की करून बघा

बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)

#रेसिपीबुक #week12

बाकरवडी नेहमी खायचं काम केलं पण हि थिम खूप छान आहे . कुकपड मुळे पहिल्यान्दा बनवायचा योग्य आला छान झाली आहे नक्की करून बघा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिटे
6-7 सर्व्हिंग
  1. पारीसाठी
  2. २०० ग्रॅम मैदा
  3. 4 टेबलस्पूनबेसन
  4. 2 टेबलस्पूनगरम तेल
  5. 1/4 टिस्पून ओवा
  6. चवीनुसार मीठ
  7. आवश्यकतेनुसार पाणी
  8. सारणासाठी
  9. 1/2 कपकिसलेलं सुकं खोबरं
  10. 1 टेबलस्पूनतीळ
  11. 1 टेबलस्पूनधणे
  12. 1 टेबलस्पूनबडीशेप
  13. 1/२ टेबलस्पून जिरे
  14. 1/२ टेबलस्पूनखसखस
  15. 2 टिस्पून तिखट
  16. चिमूटभरहिंग
  17. 1/४ टिस्पून हळद
  18. चवीनुसार मीठ
  19. 1/४ टिस्पून गरम मसाला
  20. 1/२ वाटी घट्ट चिंचेचा कोळ
  21. चिमूटभर हिंग
  22. तळण्यासाठी तेल
  23. 1 टिस्पून साखर
  24. 1/२ वाटी बारीक शेव
  25. 1 टेबलस्पूनगुळ

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    सर्व साहित्य (गुळ, बारीक शेव आणि तेल)चिंच भिजवून त्यात गुळ विरघळून घ्या.

  2. 2

    प्रथम भांड्यात मैदा, बेसन, ओवा, मीठ, गरम तेल घालुन मिक्स करून घ्या.

  3. 3

    त्या पिठाचे मुटके जसे करतो तसे हातात दिसायला हवेत, मग थोडं थोडं पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्या. झाकून १५ मिनिटे ठेवा.

  4. 4

    पॅनवर धणे, जिरे, बडीशेप, खसखस, तीळ थोडे भाजून घ्या. त्याच पॅनवर किसलेलं सुकं खोबरं थोडं भाजुन घ्या.

  5. 5

    डिशमध्ये काढून थंड झाल्यावर मीक्सरवर जाडसर भरड काढा.मीक्सरमध्ये धणे, जिरे, बडीशेप, खसखस, तीळ मीक्सरवर जाडसर भरड काढा नंतर पुन्हा खोबरं, तिखट, हळद, गरम मसाला, मीठ, हिंग, साखर व भरड काढलेली घालून सर्व एकत्र फिरवा.

  6. 6

    पिठाची गोळी घेऊन पातळ पोळी लाटा बाजूच्या कडा कापून चौकोनी आकार द्या. पोळीला चिंचेचा कोळ लावून घ्या. त्यावर सारण पसरा वरून बारीक शेव घालून लाटणं फिरवा म्हणजे शेव सारणाला चिकटेल.

  7. 7

    वरून कोथिंबीर धुवून पूर्णपणे सुकवलेली हवी हि पसरवा आता घट्ट गुंडाळी करा शेवटच्या टोकाला पाणी लावून व्यवस्थित चिकटवा. (गुंडाळी मध्ये हवा राहून नये नाहीतर तळताना सर्व सारण तेलात विरघळेल).

  8. 8

    गुंडाळी करून १ इंचाचे तुकडे कापा. कापलेली बाजू हातावर घेऊन थोडासा दाब द्या (जास्त चपटी करू नका).

  9. 9

    मंद गॅसवर तेलात तळून घ्यावी कुरकरीत कधी हि खायला तयार.

  10. 10

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Dhanashree Suki Padte
Dhanashree Suki Padte @cook_21625037
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes