बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)

Veena Suki Bobhate
Veena Suki Bobhate @cook_21535037
Kolhapur

#रेसिपीबुक #week12 #बाकरवडी

बाकरवडी आणि कचोरी सर्वांचा आवडता टी टाइम पदार्थ. म्हणजे चहा आणि बाकरवडी आणि काय पाहिजे. तिखट, गोड, आंबट खुशखुशीत बाकरवडी 2-3 अशाच जातात पोटात. सासुबाईनां दिवाळी म्हटलेले करू पण तेव्हा आम्ही मसाला वाडी करून पाहिली होती आता चान्स मिळाला तर मी करून पाहिली. मस्त झाली सासुबाईनी तर शाब्बासकी दिली मस्त वाटल. बघू कृती.

बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)

#रेसिपीबुक #week12 #बाकरवडी

बाकरवडी आणि कचोरी सर्वांचा आवडता टी टाइम पदार्थ. म्हणजे चहा आणि बाकरवडी आणि काय पाहिजे. तिखट, गोड, आंबट खुशखुशीत बाकरवडी 2-3 अशाच जातात पोटात. सासुबाईनां दिवाळी म्हटलेले करू पण तेव्हा आम्ही मसाला वाडी करून पाहिली होती आता चान्स मिळाला तर मी करून पाहिली. मस्त झाली सासुबाईनी तर शाब्बासकी दिली मस्त वाटल. बघू कृती.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 तास
5 व्यक्ति
  1. आवरणा साठी
  2. 250 ग्रॅममैदा
  3. 3 टेबलस्पूनबेसन
  4. 3 टेबलस्पूनतेल
  5. अनावश्यकते नुसार पाणी
  6. सारणासाठी
  7. 3 टेबलस्पूनसुके खोबरे
  8. 1 टेबलस्पूनमिरची पावडर
  9. 1/2 टीस्पूनहळद
  10. 2 टेबलस्पूनधणे जिरे पावडर
  11. 1 टीस्पूनखसखस
  12. 1/2 टीस्पूनबडीशेप
  13. 1 टीस्पूनतिळ
  14. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  15. 4-5 टेबलस्पूनबारीक शेव
  16. 1/2 टीस्पूनसाखर
  17. आवश्यकतेनुसार मीठ

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    सर्व साहित्य घेवू

  2. 2

    सर्व प्रथम आपण आवरणा साठी पीठ तयार करून घेवू एका परातीत मैदा बेसन मीठ घेवू त्यात 3 टेबलस्पून तेल गरम करून घालू. छान मिक्स करून. त्यात आता आवश्यकतेनुसार पाणी घालून चपाती साठी जस पीठ मळून घेतो तसे मळून बाजूला ठेवू.

  3. 3

    आता सारण बनवून घेवू सुके खोबरे थोडे भाजून घेवू. त्याच प्रमाणे तिळ खसखस आणि बडीशेप भाजून घेवू. आता मिक्सरमधे सुके खोबरे, तिळ, बडीशेप खसखस, मसाला, गरम मसाला, हळद, धणे जिरे पावडर, मीठ,थोडा बारीक शेव आणि साखर घालून मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे.

  4. 4

    तयार झालेला सारण एका बाउल मध्ये काढून घेवू.

  5. 5

    मळून ठेवलेल्या पीठाचे चार गोळे करून घेवू. एका गोळ्याचा मोठी पती लाटून घेवू. त्यावर चिंच गूळ घेतलेली चटणी पसरून घेवू. आता त्या वर तयार मसाला सारण पसरून घेवू. त्या वर थोडा शेव भुरभुरून लाटणी च्या सहाय्याने त्याला प्रेस करून घेवू.

  6. 6

    आता पोळी गुंडाळून घेवू. आवश्यक वाटल्यास कडांना पाणी लावू शकता. घट्ट गुंडाळून घ्यावे. आता सुरीने कापून घेवुन थोडा दाबून घ्यावे. असे सर्व गोळ्यांचे बाकरवडी करून घ्यावी.

  7. 7

    सर्व बाकरवडी तयार झाल्यावर. एका कढईत तेल गरम करून मंद आचेवर तळून घ्यावे. तयार खुसखुशीत बाकरवडी. चहा बरोबर मस्त पार्टनर.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Veena Suki Bobhate
Veena Suki Bobhate @cook_21535037
रोजी
Kolhapur

टिप्पण्या

Similar Recipes