पौष्टिक मोमोज (healthy momos recipe in marathi)

Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
Bangalore

#मोमोज #सप्टेंबर

मोमोज चे व्हेज मोमोज ,चिकन मोमोज, सोया मोमोज, तंदुरी मोमोज, पनीर मोमोज, चोकलेट मोमोज आसे आनेक प्रकार आहेत. मी सारणासाठी कडधान्ये , भाज्या , चीज वापरले आहे आणि मैद्याच्या ऐवजी गव्हाच्या पीठाचा वापर करून मोमोज बनवले आहेत.

पौष्टिक मोमोज (healthy momos recipe in marathi)

#मोमोज #सप्टेंबर

मोमोज चे व्हेज मोमोज ,चिकन मोमोज, सोया मोमोज, तंदुरी मोमोज, पनीर मोमोज, चोकलेट मोमोज आसे आनेक प्रकार आहेत. मी सारणासाठी कडधान्ये , भाज्या , चीज वापरले आहे आणि मैद्याच्या ऐवजी गव्हाच्या पीठाचा वापर करून मोमोज बनवले आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. मोमोज कव्हरसाठी
  2. 1 कपगव्हाचे पीठ
  3. 1टिस्पून तेल
  4. चवीनुसार मीठ
  5. सारणासाठी
  6. 1गाजर
  7. 1/2 कपमोड आलेली मिक्स कडधान्ये
  8. 1शिमला मिरची
  9. 1चीज स्लाईस
  10. 1-2हिरव्या मिरच्या
  11. 5-6लसूण पाकळ्या
  12. 1/2 टिस्पून काळिमीरी पावडर
  13. 1कांदा
  14. 1 टेबलस्पूनपिझ्झा सॉस
  15. 1 टिस्पून तेल
  16. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

40 मिनिटे
  1. 1

    प्रथम बाऊलमध्ये गव्हाचे पीठ, तेल, मीठ घालून पीठ मळून घ्यावे. 15 मिनिटे बाजूला झाकून ठेवून द्यावे. सर्व भाज्या बारीक चिरून घ्या.

  2. 2

    कढईत तेल गरम करून त्यात लसूण हिरवी मिरची घालून परतावे. कांदा घालून मिक्स करा. मिक्स कडधान्ये घालून थोडस परतून घ्यावे.

  3. 3

    गाजर शिमला मिरची घालून मिक्स करा. काळिमिरी पावडर, मीठ घालून मिक्स करा.

  4. 4

    पिझ्झा सॉस घालून मिक्स करा. गॅस बंद करा मिश्रण थंड होऊ द्या. चीज स्लाईस कट करून घाला. मिक्स करा.

  5. 5

    पीठाचे लहान गोळा करून पारी लाटून घ्या. तयार सारण भरून सर्व बाजूने एकत्र करून मोमोज चा आकार द्यावा.

  6. 6

    आशा प्रकारे सर्व मोमोज तयार करून घ्या स्टिमर मध्ये 10 -15 मिनिटे वाफवून घ्यावे.

  7. 7

    तयार झाले की सॉस सोबत सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
रोजी
Bangalore
Eating is necessity but cooking is an art#lovecooking❤️❤️
पुढे वाचा

Similar Recipes