व्हेज तंदूरी मोमोज (tandoori momos recipe in marathi)

Dipali Kathare
Dipali Kathare @cook_24949351

#मोमोज
#सप्टेंबर
नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर व्हेज तंदूरी मोमोज ही रेसिपी शेअर करत आहे. हा एक अजून एक वेगळा प्रयत्न म्हणून मी तयार करून बघितलेला आहे . खरं तर हा माझा पहिलाच प्रयत्न पण हे मोमोज खूपच सुंदर बनले व घरात सर्वांना आवडले .यामध्ये तुम्ही नॉनव्हेज स्टफिंग सुद्धा करू शकता पण माझ्या घरात माझ्या मुलांना व्हेज मोमोज जास्त आवडत असल्यामुळे मी यामध्ये व्हेजिटेबल्स चा वापर केलेला आहे.
कुरकुरे मोमोज बरोबर मि मोमोज ची चटणी ची रेसिपी शेअर केलेली आहे. या मोमोज वर मी वरून चाट मसाला घालून हे गरमागरम सर्व्ह केलेत.
तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगावे.

व्हेज तंदूरी मोमोज (tandoori momos recipe in marathi)

#मोमोज
#सप्टेंबर
नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर व्हेज तंदूरी मोमोज ही रेसिपी शेअर करत आहे. हा एक अजून एक वेगळा प्रयत्न म्हणून मी तयार करून बघितलेला आहे . खरं तर हा माझा पहिलाच प्रयत्न पण हे मोमोज खूपच सुंदर बनले व घरात सर्वांना आवडले .यामध्ये तुम्ही नॉनव्हेज स्टफिंग सुद्धा करू शकता पण माझ्या घरात माझ्या मुलांना व्हेज मोमोज जास्त आवडत असल्यामुळे मी यामध्ये व्हेजिटेबल्स चा वापर केलेला आहे.
कुरकुरे मोमोज बरोबर मि मोमोज ची चटणी ची रेसिपी शेअर केलेली आहे. या मोमोज वर मी वरून चाट मसाला घालून हे गरमागरम सर्व्ह केलेत.
तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
  1. २०० ग्रॅम मैदा
  2. 1 टेबलस्पूनतेल
  3. चवीनुसार मीठ
  4. आतील सारणासाठी
  5. 1 वाटी कॅबेज
  6. 1-2गाजर
  7. 1कांदा
  8. 5-6लसूण पाकळ्या
  9. 1 इंचआलं
  10. 1/2मिरी पावडर
  11. चवीनुसार मीठ
  12. मॅरीनेशन साठी
  13. १०० ग्रॅम दही
  14. 1 टीस्पूनआलेलसूण पेस्ट
  15. 1 टीस्पूनलाल तिखट पावडर
  16. 1/2 टिस्पून आमचूर पावडर
  17. 1/2 टीस्पूनचाट-मसाला
  18. 1/2 टीस्पूनकसूरी मेथी
  19. 1/4 टीस्पूनहळद
  20. चवीपुरते मीठ

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    प्रथम बाऊल मध्ये मैदा एक टेबलस्पून तेल व मीठ घालावे व ते पाणी घालून मळून घ्यावे.हे मळलेले पिठ अर्धा तासासाठी कव्हर करून साईडला ठेवावे आता आपण बाकीची तयारी सुरू करूयात.

  2. 2

    कॅबेज व गाजर किसून घेणे कांदा बारीक चिरून घेणे आले लसूण बारीक करून घेणे.आता एका कढई मध्ये तेल घालून त्यामध्ये प्रथम आले लसूण पण नंतर कांदा दोन मिनिट परतून घेणे. मग त्यामध्ये कॅबेज गाजर घालून पाच मिनिटे फ्राय करून घेणे. यामध्ये तुम्ही अजून तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता माझ्याकडे अवेलेबल आहेत त्यांनी ऍड केलेले आहेत.आता यामध्ये मिरी पावडर व मीठ घालून पाच मिनिटे परतून घेणे या भाज्या जास्त शिजवू नयेत. हे झाले आपले मोमोज चे सारण तयार

  3. 3

    आता आपण मोमोज तयार करून घेऊ या पिठाचा एक गोळा घेऊन तो लाटून घेणे व मग त्यामध्ये आपण बनवलेले व्हेजिटेबल्स चे सारण भरून तुम्ही त्याला कोणत्याही प्रकारचा शेप देऊ शकता. त्याला मी मोदकासारखा शेप देत आहे. फोटो दाखवल्या प्रमाणे सर्व मोमोज तयार करून घेणे.

  4. 4

    आता हे मोमोज आपण स्टीम करून घेणार आहोत. हे मनोज साधारण मी दहा मिनिटे इडली पात्र मध्ये स्टीम करून घेतले आहेत. आता हे मोमोज गार झाल्यावर आपण ते मॅरीनेशन साठी ठेवणार आहोत

  5. 5

    आता मॅरीनेशन चे साहित्य पाहुयात. एका बाऊलमध्ये दही घ्यावे दही खूप पातळ नसावे घट्ट दही घेणे गरजेचे आहे. त्यामध्ये आले-लसूण पेस्ट, लाल तिखट पावडर, हळद, आमचूर पावडर, चाट मसाला, मीठ हे सर्व मिक्स करुन घेणे.

  6. 6

    आता या दया च्या मिश्रणामध्ये आपण आपले गार झालेले मोमोज मॅरीनेट करण्यासाठी ठेवणार आहोत.साधारण हे मोमोज आपल्याला दोन तासासाठी मॅरिनेट करायचे आहेत पण बाहेरच फ्रिज मध्ये ठेवायचे नाही येत.

  7. 7

    आता दोन तास झाले आहेत आता हे मनोज आपल्याला फ्रायपॅन मध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. त्यासाठी एका पॅनमध्ये थोडे तेल घालावे व तेल गरम झाल्यावर आता आपण हे मनोज दोन्ही साईड ने व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत.या पॅनमध्ये वाटी ठेवून त्यामध्ये कोळसा घालून थोडेसे तूप सोडून त्यावर कव्हर करून तुम्ही त्याला थोडासा अजून तंदुरी सारखा लुक देऊ शकता पण माझ्याकडे आत्ता कोळसा अवेलेबल नाही पण तुम्ही नक्की करून पाहावे.

  8. 8

    अशा पद्धतीने मी हे तंदुरी मोमोज तयार केलेले आहेत. आता हे सर्व करताना त्यावर थोडा चाट मसाला व कोथिंबीर ने मी डेकोरेट केलेले आहेत. पण त्याबरोबर मी घरी बनवलेली मोमो चटणी सर्व करत आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Dipali Kathare
Dipali Kathare @cook_24949351
रोजी

Similar Recipes