हॅश ब्राऊन / अमेरिकन ब्रेकफास्ट (hash browns recipe in marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#रेसिपीबुक #week13
इंटरनॅशनलरेसिपी
अमेरिकन लोकं ब्रेकफास्ट मधे हॅश ब्राऊन हे खूप आवडीने खातात. आमच्या घरी पण सगळ्यांना हा अमेरिकन ब्रेकफास्ट खूप आवडीचा आहे. या हॅश ब्राऊनची रेसिपी देत आहे.

हॅश ब्राऊन / अमेरिकन ब्रेकफास्ट (hash browns recipe in marathi)

#रेसिपीबुक #week13
इंटरनॅशनलरेसिपी
अमेरिकन लोकं ब्रेकफास्ट मधे हॅश ब्राऊन हे खूप आवडीने खातात. आमच्या घरी पण सगळ्यांना हा अमेरिकन ब्रेकफास्ट खूप आवडीचा आहे. या हॅश ब्राऊनची रेसिपी देत आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
४ जणांसाठी
  1. 5सोललेले बटाटे
  2. 1अंड
  3. १०० ग्रॅम मैदा
  4. 2 टीस्पूनक्रश केलेली लसूण
  5. 2 टीस्पूनबारीक चिरलेली कोथिंबीर
  6. 2 टीस्पूनमीठ
  7. 2 टीस्पूनमिरेपूड
  8. 1 लहानकांदा बारीक चिरलेला
  9. 2 टेबलस्पूनतेल
  10. 1 टीस्पूनबटर
  11. 1 टेबलस्पूनमेयो डिप

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    सोडलेले बटाटे किसणीवर किसून ते लगेचच एका बाऊल मधील थंड पाण्यामध्ये घालावे, म्हणजे बटाट्याचा कीस काळा पडत नाही.

  2. 2

    मग गार पाण्यातून बटाट्याचा कीस काढून तो रुमाला मध्ये ठेवून घट्ट पिळून घ्यावा.

  3. 3

    बटाट्याच्या कीसा मध्ये मैदा, फेटलेले अंडे, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, किसलेला लसून, मीठ, मिरपूड आणि तिखट पूड घालावी.

  4. 4

    ते सर्व मिश्रण चांगले एकत्र करावे. मग फ्राइंग पॅममधे आधी तेल घालून मग त्यात बटर घालावे म्हणजे बटर जळणार नाही. त्यावर बटाट्याचे मिश्रण हवे त्या शेप मधे घालून हॅश ब्राऊन बनवावे आणि ते दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घ्यावे. मी मोबाईल शेप मधे मिश्रण घालून हॅश ब्राऊन बनवून चांगले खरपूस फ्राय करून घेतले.

  5. 5

    फ्राय केलेले हॅश ब्राऊन एका प्लेट मधील टिशू पेपर वर ठेवून जास्तीचे तेल टिपून घ्यावे. मग मग एका सर्व्हिंग प्लेटमध्ये गरमागरम हॅश ब्राऊन ठेवून सोबत मेयो डिप ठेवून सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
रोजी

Similar Recipes