आळूवडी (aluvadi recipe in marathi)

#रेसिपीबुक #week14 #आळूवडी
श्रावण महिना म्हटलं की अळू वडी पानात नाही असे घर विरळाच. गणपतीतही गौरीच्या नेवैद्यात अळूवडीला विषेश स्थान आहे.अळूच्या पानांचा महिन्यातून दोनदा ते तीनदा आपल्या आहारात जरूर समावेश करावा. खूप तंतुमय पदार्थ असल्यामुळे वजन कमी करणाऱ्यांसाठी किंवा मधुमेही लोकांसाठी अळू अतिशय उपयुक्त आहे. आळूवडी करता मोठी पान घ्यावीत.
आळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 #आळूवडी
श्रावण महिना म्हटलं की अळू वडी पानात नाही असे घर विरळाच. गणपतीतही गौरीच्या नेवैद्यात अळूवडीला विषेश स्थान आहे.अळूच्या पानांचा महिन्यातून दोनदा ते तीनदा आपल्या आहारात जरूर समावेश करावा. खूप तंतुमय पदार्थ असल्यामुळे वजन कमी करणाऱ्यांसाठी किंवा मधुमेही लोकांसाठी अळू अतिशय उपयुक्त आहे. आळूवडी करता मोठी पान घ्यावीत.
कुकिंग सूचना
- 1
आळूचे पान स्वच्छ धुवून पानांच्या मागच्या शिरा चाकू ने काढून घ्याव्या.
- 2
डाळीच्या पीठाचे मिश्रण बनवण्यासाठी एका मोठ्या भांड्यात डाळीच पीठ,तिखट,मीठ,गोडा मसाला, चींचेचा कोळ,गुळ,थोडी कोथिंबीर व तीळ घालून पीठ साधारण पसरवता येइल असे पाणी घालून भिजवून घ्यावे.
- 3
तयार मिश्रण एका पानावर लावून त्यावर दुसरे पान ठेवावे व त्यालाही पीठाचे मिश्रण लावून घ्यावे. पानाची गुंडाळी करून घ्यावी.असे इतर पानांचेही करून घ्यावे
- 4
तयार पानांची गुडांळी मोदकपात्रात जाळीवर ठेवून 10-15 मिनिटे वाफवून घ्यावी.
- 5
तयार गुडांळीच्या वड्या कापून वरून फोडणी घालून सर्व्ह कराव्या किंवा तेलात क्रीस्पी तळून सर्व्ह कराव्या.
- 6
फोडणीतली आळूवडी व तळलेली आळूवडी तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
अळूवडी रेसिपी (aloo vadi recipe in marathi)
#KS1श्रावण महिना म्हटलं की अळू वडी पानात नाही असे कोकणातील घर विरळाच. गणपतीतही गौरीच्या नेवैद्यात अळूवडीला विषेश स्थान आहे.अळूची पाने दोन प्रकारची असतात. ज्या पानांचे दांडे आणि देठ काळपट रंगाचे असतात ती पाने अळुवडीसाठी वापरतात.चला पाहूयात अळूवडीची रेसिपी, nilam jadhav -
खुसखुशीत अळू वडी (alu vadi recipe in marathi)
#ashr#आषाढ महिना स्पेशल रेसिपी#खुसखुशीत अळू वडी Rupali Atre - deshpande -
अळुवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14अळुवडी हा पदार्थ सर्वांच्या अत्यंत आवडीचा प्रकार. अळू वडी ची पाने आकाराने मोठी, गर्द हिरव्या रंगाची आणि मोठ्या दांड्याची, थोडी जाड असतात. अळू वडी करण्याचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत पण आज मी तुम्हाला पारंपारिक ब्राह्मणी पद्धतीची अळू वडी रेसिपी सांगणार आहे. ज्यामध्ये काही घटक पदार्थांमुळे याला खूपच सुंदर चव येते. आमच्या घरी अळू वडी ही तळून खायला आवडते तिची कुरकुरीत चव सर्वांना खूप आवडते, अशा वेळी डाएट थोडा वेळ विसरावे लागते. घरी पूजा, गणपती, काही मंगल कार्य असेल तर या अळू वडी शिवाय जेवण पूर्ण होत नाही.Pradnya Purandare
-
आळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14#आळूवडी आणि बर्फी रेसिपीआळूवडी हा प्रकार लहानपणापासून घरात नेहमी बननारा आहे. प्रचंड आवडणारा पदार्थ म्हणायला हरकत नाही. घराच्या बागेत तरारलेला आळू त्याची ताजी ताजी पान कापून आणायची आणि हव तेव्हा बनवा वडी हा नित्यक्रम गेली अनेक वर्षे माहेरी चालूच आहे. आता लग्नानंतर विकतची पानं मिळतात मात्र आई आजही आल्या गेल्याकडे आवर्जून आळूची पानं पाठवून देते. मला उकडलेली वडी फार आवडते त्यामुळे मी वाफवलेली एक वळकुटी तशीच खायला ठेवते नेहमी. पण तेलात परतून ही आळूवडी खूप छान लागते. Supriya Devkar -
-
-
अळू वडी (alu vadi recipe in marathi)
#shr#week-3श्रावणात अळू ची पान भरपूर प्रमाणात येतात आम्ही श्रावणात अळू चे भाजी बनविण्यापासून सर्वच प्रकार बनवतो त्यातलाच हा एक प्रकार आहे अळू वडी चा थोडा वेगळा प्रयत्न केलाय तुम्ही पण बनवुन बघा नक्की आवडणार तुम्हाला चला तर मग रेसिपी पाहूयात आरती तरे -
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14अळूवडी .... जेवणाच्या पानात असली की संपुर्ण जेवणाला खमंग चव येते. बरोबर ना...आता Shubhangee Kumbhar -
-
आळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week14#आळूवडीआणिबर्फीअळूच्या पानामध्ये 'अ' जीवनसत्व भरपूर प्रमाणात आढळतात. अळूच्या पानात असणारे योग्य प्रमाणात कॅल्शियम तुमची हाडे मजबूत ठेवतात. डोळ्याच्या प्रत्येक समस्या वर अळूची वडी लाभदायी आहे. तसेच ज्यांना मधुमेह आजार आहे त्यांनी अळूवडी खाल्ल्याने फायदा होतो. साखर नियंत्रणात राहते. प्रोटीनचा उत्तम घटक म्हणून आळूवडी खाली. पण ज्यांना यूरिक ॲसिड चा त्रास जास्त आहे, अशांनी कमी खावी. आळूला नैसर्गिक रित्या खाज असल्याने तो स्वच्छ आणि साफ करणे आवश्यक आहे. तसेच अपुरा शिजवल्यास लूज मोशन चा त्रास होऊ शकतो. म्हणून शिजवताना तो नीट शिजवून घ्यावा...काळसर देठाची आळु ही अळू वडी साठी वापरली जातात.... आणि हिरवट देठाची पाने आळुच्या भाजीसाठी वापरली जातात, आळूवडी साठी पाने घ्याल, तेव्हा ती पाने एकसारखे, थोडीफार एका आकाराची असलेली घ्याल. त्यामुळे रोल चांगला होतो व एकसारख्या वड्या पाडता येतात. मला आळूची पाने व्यवस्थित न मिळाल्यामुळे लहान मोठ्या वड्या कराव्या लागल्या.. पण छान कुरकुरीत झाल्यात.... 💕💃🏻💕💃🏻 Vasudha Gudhe -
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14#अळूवडी #post 1अळू वडीच नेवेद्य मध्ये मुख्य स्थान आहे. पोळा असो, अक्षतृतीय, पित्रू मोक्षा अमावस्य, महालक्ष्मी यांना अळूची वडी चा नैवेद्य प्रामुख्याने असतो. Vrunda Shende -
मिक्स पिठाची पौष्टिक अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14#मिक्स पिठाची पौष्टिक अळू वडीअळू वडी हा एक पारंपरिक प्रकार आहे यात मी थोडा नाविन्यता आणुन पौष्टिक वकुरकूरीत अशी अळू वडी बनवली आहे.आमच्या कडे जनता कर्फ्यू मुळे मला अळूची पाने मिळत नव्हती. माझ्या एका मैत्रिणीला मी बोलले तिने लगेचच तिच्या कुंडितील अळूची पाने काढून दिली मी तिला आधी धन्यवाद देते. कारण मी ही थीम तीच्यामूळे पुर्ण करू शकले.हा पदार्थ पुर्वापार आपण करत आलो आहे.यात पाने वापरताना वडी लहान व कोवळी पाने तर भाजी साठी मोठी पाने वापरावी. आणि नेहमी दोघं प्रकार करताना चिंच कोळ वापरावा म्हणजे घशाला खाजरे येत नाही.आमच्या गावी (महाराष्ट्रात काही भागात नंदूरबार ,शहादा, दोंडायच्या इकडे चिंचेच्या चटणी बरोबर सर्व्ह करतात.) Jyoti Chandratre -
अळुवडी (aloo wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5अळुवडी ही महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये खूप प्रसिद्ध आहे.पावसाचा एकच जोरदार शिडकावा झाला की घराच्या आवारात-शिवारात अळुचं बनच्या बन लसलसायला लागतं. सुरुवातीला लहानुली असलेली पानं थोड्याच दिवसात हाताच्या पशाला मागे टाकतात...!अळूची पाने दोन प्रकारची असतात. ज्या पानांचे दांडे आणि देठ काळपट रंगाचे असतात ती पाने अळुवडीसाठी वापरतात. भाजीचा अळू आणि वडीचा अळू अशी साधारण वर्गवारी केली जाते.खूप तंतुमय पदार्थ असल्यामुळे वजन कमी करणाऱ्यांसाठी किंवा मधुमेही लोकांसाठी अळू अतिशय उपयुक्त आहे. A, B6 आणि C जीवनसत्वे यामध्ये खूप प्रमाणात असतात.पावसाळ्यात पाऊस असो वा नसो कोकणातल्या जमिनी पाणथळ असल्यामुळे जमिनीतल्या पाण्यावर अळू वाढत राहातो. गणपतीला नेवैद्यात अळूवडीला विषेश स्थान आहे. मी मालवणी पद्धतीच्या अळुवडीची रेसिपी शेअर करत आहे. नक्की ट्राय करा!!! Priyanka Sudesh -
मालवणी आळू वडी (Malvani alu wadi recipe in marathi)
#MLR#मार्च लंच रेसिपीजजेवणात चटणी कोशिंबीर बरोबर तळण हे हवेच. म्हणून ही नेहमीपेक्षा वेगळी अळू वडी. Sumedha Joshi -
अळूवडी.. (aloowadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 सात्त्विक रेसिपीज सात्त्विक रेसिपीज या बिना कांदा लसणाच्या असतात..मागच्या सात्त्विक रेसिपी मध्ये आपण श्रावण महिन्यात सणासुदीला सात्त्विक रेसिपी का खातो ते बघितलंय. श्रावणात क्षणात येते सरसर शिरवे...श्रावणसरी बरसत असतात..आणि या दिवसात खूप सार्या रानभाज्या उगवतात..त्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त असतात..त्याचप्रमाणे भाजीचं अळू,वडीचं अळू देखील फोफावलेलं असतं..म्हणूनच का याला *वेडं अळू *म्हणतात.🤔..असो..अळूचे गुणधर्म मी आता इथे काही सांगत बसत नाही..तुम्ही तेवढे गुगलून घ्या..म्हणजे गुगल करा हो..😄.... तर या अळूवडीला,अळूभाजीला नैवेद्याच्या पानात अग्रभागी स्थान असतेच असते..या दोन्ही शिवाय नैवेद्य पुरा होत नाही..फक्त याची एक खोड म्हणजे..अळू खाजरा असतो काही वेळेस..म्हणून मग चिंचेचा कोळ घातला की अळूमधले crystals त्यात विरघळतात..आणि मग घसा खवखवत नाही..आणि मग प्राप्त होते स्वर्गीय चवीची खमंग खरपूस चवदार रुचकर अशी अळूवडी..आहा...तर मग चला चला लवकर..या माझ्या पाठोपाठ या cookpad च्या virtual किचनमध्ये😄😄 Bhagyashree Lele -
आळुवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 पावसाळ्यात भरपुर आळुची पाने मिळतात आळु वडी सगळ्यांनाच आवडते आळुवडी वेगवेगळ्या प्रकारे केली जाते डिपफ्राय शॉलोफ्राय किंवा भाजी पण केली जाते आज मी माझ्या पद्धतीने आळुवडी कशी करायची ते तुम्हाला सांगते Chhaya Paradhi -
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 खुसखुशीत आंबट-गोड चव असलेली आळुवडी जेवणाच्या ताटात असेल तर जेवणाची चव आणखीनच वाढते. म्हणूनच आंबट गोड अशा खुसखुशीत अळूवडीची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. Sushma Shendarkar -
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 #अळूवडी खूप दिवसानंतर अळू वडी केली,सध्याचा वातावरणामुळे खूप महिने झालं अळू आणला नव्हता पण आज आपली थीम होती म्हणून घेऊन आले व अळूवड्या केल्या.. Mansi Patwari -
आळूवडी (Aluvadi Recipe In Marathi)
पावसाळ्यात अळूची पानं अतिशय सुंदर मिळतात त्याची वडी खूप खुसखुशीत होते Charusheela Prabhu -
अळूचं फदफद (alooch fadfad recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळ्यात अळूच्या पानांचा नुसता बहर असतो.आणि अळू ची पान पौष्टिक असतात. आज मी अळूचे फदफद सांगणार आहेत. Bhanu Bhosale-Ubale -
-
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14मी या वड्या डीप फ्राय आणि फोडणी घालून अशा दोन्ही प्रकारे तयार केले आहेत. Suvarna Potdar -
आळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14#आळूवडी गणपती उत्सव झाला की पित्तरपाटा सुरु होतो पुर्वजाना जेऊ घातले जात असते तेव्हा अनेक प्रकार बनवले जातात त्या पैकी एक हा पदार्थ आहे आवजुन केला जातो नैवेद्य च्या ताटात अळुवडी विशेष महत्त्व दिले जाते तसेच नागपंचमीला देखील उकडी चे पदार्थ बनतात तेव्हा हे बनवले जातातच माझ्या घरी तळलेली व फोडणीचे आळुवडी असते (टिप आळूचे पान हे काळ्या देठाचे आणावे ते कधीच खवखवत नाही ) Nisha Pawar -
-
आळुवडी (Alu Vadi Recipe In Marathi)
#PRR पितृपक्षात नैवेद्याचे पान बनवलं जातं त्यामध्ये मुख्यत्वे आळूवडीचा समावेश असतोच त्यासोबतच भाज्यांमध्ये भेंडी गवारी कारले मेथी भजी पुरणपोळी यांचाही समावेश असतो आज आपण अळूवडी बनवणार आहोत Supriya Devkar -
बॉक्स अळूवडी (box aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14अळूवडी रेसिपी मी आधी पोस्ट केली होती. त्यामुळे थोडी वेगळी स्टाईल व वेगळ्या शेप मध्ये बनवली आहे. shamal walunj -
डाळ मिश्रीत अळू वडी (dal mix alu wadi recipe in marathi)
#ngnr#नो ओनियन,नो गार्लिक रेसिपी "डाळ मिश्रीत अळू वडी"नेहमी आपण बेसन पीठ, तांदूळ पीठ वापरून अळू वडी, कोथिंबीर वडी बनवतो..पण कधी डाळ भिजवून, वाटून मसाले घालून बनवुन बघा.तुम्हाला नक्कीच आवडेल.. खुप छान कुरकुरीत आणि टेस्टी होते वडी..एकदा ही रेसिपी बनवताना माझ्या आईने सांगितलेला किस्सा आठवला.. पुर्वी गावी घरीच जात्यावर दळण दळायचे,घरचे धान्य,डाळी असायचे....आजी दिवसभर कुठेतरी शेजारच्या गावी जाणार होती,तिने आईला सांगितले डाळ दळून घे मग अळू वडी कर...आईला वाटले जात्यावर दळण म्हणजे जास्त डाळ दळावी लागेल मग तिने अळूवडी साठी लागेल तेवढीच डाळ दोन तास भिजत ठेवली व दगडी पाट्यावर वाटून घेतली.व अळूवडी बनवली..आजी, आजोबांना ती अळूवडी खुप आवडली.तेव्हापासून आमच्या घरात डाळ वाटून च अळूवडी बनू लागली.. नंतर मिक्सर आला मग पाट्यावर वाटायचे श्रम ही बंद झाले... मला आठवण झाली की अधुनमधून डाळ वाटून करते अळूवडी.. लता धानापुने -
डाळींच्या वाटणाची अळुवडी (aluwadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 सात्विक म्हणजे कांंदा लसुण न वापरता . अळुवडी हा प्रकार श्रावण मध्ये बनवतात. आणि नैवेद्याला पानात पण वाढतात. Kirti Killedar -
खमंग कुरकुरीत अळूवडी (alu wadi recipe in marathi)
#ashrआषाढ,श्रावण सुरू झाला की अनेक सण, मग त्यासाठी लागणारे पदार्थ, पावसाळ्यात रानभाज्या ही सगळी चंगळ अगदी गौरी गणपती, दसऱ्यापर्यंतच सुरू असते.ह्या सगळ्या चंगळवादात सणासुदीला एक चमचमीत पदार्थ हमखास पानात वाढलेला दिसतो. तो म्हणजे अळू वडी...😋😋आज माझ्या सासऱ्यांनी खास गावाहून अळूची पाने माझ्यासाठी पाठवली , आषाढ स्पेशल रेसिपीज थीमसाठी आज खास ही वडी बनवली. कोकणातल्या अळूच्या पानांची चवच न्यारी!!ही पानं सुपापेक्षाही मोठी असतात , त्यामुळे वडी करायला फार मजा येते...😊पावसाळ्यात या पानांना खूप छान चव असते.अळूची पाने ही पित्त आणि कफनाशक असून, भरपूर प्रमाणात असलेल्या लोह तत्त्वामुळे शरीरात रक्त वाढण्यास मदत होते.चला मग पाहूयात चमचमीत आणि कुरकुरीत अळूवडीची रेसिपी...😊 Deepti Padiyar -
More Recipes
टिप्पण्या