रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीबेसन
  2. 2 टिस्पून तांदुळाचे पीठ
  3. 1/२ टिस्पून लाल तिखट
  4. 1/२ टिस्पून धने पावडर
  5. 1/२ हळद
  6. 1/ २ गरम मसाला
  7. चवीनुसार मीठ
  8. चिंच
  9. 1/२ वाटी गुळ
  10. 10अळूचे पान

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    प्रथम चिंच पाण्यात भिजत ठेवली.नंतर त्याच्यामध्ये गुळ टाकला. चिंचेचा कोळ बनवून घेतला. नंतर एका भांड्यामध्ये बेसन घेऊन. त्यामध्ये तांदुळाचे पीठ टाकले तिखट, गरम, मीठ,मसाला, धने पावडर टाकले व मिक्स करून घेतले. नंतर 300 चा कोड त्यामध्ये टाकला व थोडे पाणी टाकून पीठ भिजवून घेतले.

  2. 2

    नंतर चिंचेचा कोड त्यामध्ये टाकला व थोडे पाणी टाकून पीठ भिजवून घेतले.आळूची पाने पाण्याने स्वच्छ धुऊन घेतली नंतर त्याची साल देठ व पाठीमागची साल काढून घेतले. पोळपाटावर थोडे लाटण्याने लाटून घेतले. त्यावर तयार केलेले मिश्रण लावले.

  3. 3

    नंतर एकावर एक पान ठेवून.परत त्यावर तयार केलेले मिश्रण लावले अशा प्रकारे पाच पान मिश्रण लावले.आणि त्याचा रोल बनवून घेतला.अशाप्रकारे तीन रोल बनवून घेतले. गॅसवर गंज ठेवून त्यामध्ये पाणी घातले व चाळनीमध्ये ते रोल ठेवले.व झाकण ठेवले. पंधरा मिनिट वाफवून घेतले.

  4. 4

    वाकून घेतल्या नंतर थोडे थंड होऊ द्यावे नंतर गॅसवर कढई ठेवून. त्यामध्ये तेल टाकले तेल गरम झाल्यानंतर बनवलेल्या रोलचे चाकूने छोटे-छोटे वड्या कट करून घेतले. तेलामध्ये छान खरपूस खमंग तळून घेतले.

  5. 5

    अशाप्रकारे अळूवडी खमंग खुसखुशीत म्हणून घेतली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mrs.Rupali Ananta Tale
Mrs.Rupali Ananta Tale @cook_21129734
रोजी
Ambarnath

टिप्पण्या

Similar Recipes