मिक्स स्प्राउट पकोडे (mix sprout pakoda recipe in marathi)

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

#GA4 #week3
#पकोडा
#मिक्स स्प्राउट पकोडे
पकोडे नेहमीच केले जातात पण हेल्दी स्प्राउटचे पकोडे बनवून बघायला काय हरकत असा विचार करून कडधान्ये आदल्या दिवशी भिजवून मोड आणून घेतले आणि पकोडे बनवले अगदी कुरकुरीत हलकी अशे पकोडे बनले चला तर मग बघूया.(आदल्या दिवशी सहा _सात तास कडधान्ये भिजवून घेतले स्वच्छ धुवुन उपसून चाळनित अर्धा तास पाणी तुटेपर्यंत ठेवले नंतर स्प्राउट मेकर मध्ये घालून रात्रभर ठेवून दुसय्रादिवशी सकाळी काढले) चवळी,हरबरा,वाटाणे याला मोड यायला जास्त वेळ लागतो जवळ जवळ 1 1/2 दिवस लागतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पंचवीस मिनिट
  1. 100 ग्रॅममुग मोड आणून घेतले
  2. 2 टेबलस्पूनचवळी हे पण भिजवून मोड आणून
  3. 1 टेबलस्पूनहरबरे भिजवून मोड आणून
  4. 1 टेबलस्पूनवाटाणे भिजवून मोड आणून
  5. 1 टीस्पूनधने
  6. 1 टीस्पूनजिरे
  7. 2-3हिरव्या मिरच्या तिखट आवडी प्रमाणे घ्यावे
  8. 7-8 लसूण कळ्या
  9. 1 टेबलस्पूनकोथिंबीर चीरून
  10. तेल तळण्यासाठी
  11. 1 आणि 1/2 टीस्पूनमीठ
  12. 1कांदा

कुकिंग सूचना

पंचवीस मिनिट
  1. 1

    कांदा,कोथिंबीर बारीक चीरून घ्या. आधी चवळी,हरबरा, वाटाणे,लसूण,जिरे,धने, मिरच्या एकत्र मिक्सरमधून जाडसर भरड करा.

  2. 2

    मुग पण मिक्सरमधून रवाळ भरड करून घ्या. दोघ भरड एकत्र करा त्यात मीठ,कांदा,कोथिंबीर घालून एकत्र करून घ्या.

  3. 3

    कढईत तेल घालून गरम करा.मिश्रण एकत्र करून घ्या. पकोडे मिडीयम लो फ्लेमवर तळून घ्या.

  4. 4

    असेच सगळे पकोडे तळून घ्या. आणि टोमॅटो केचप बरोबर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes