मिक्स स्प्राउट सॅलड (mix sprouts salad recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#sp मिक्स स्पाउट सॅलड साठी मी मोड आलेली कडधान्य वापरली आहेत कारण त्यात भरपुर प्रमाणात प्रोटीन असतात आपल्या शरीराला त्याची जास्त आवश्यकता असते मोड आलेल्या कडधान्याने वजन कमी होते शरीराला पुरेशी उर्जा मिळते दिवसभर फ्रेश वाटते मोड आलेल्या कडधान्याच्या सेवनाने मधुमेहींची साखर नियंत्रित राहाते तसेच व्हिटॅमिन मिनरल्स मुळे केस व त्वचेला फायदा होतो त्यात व्हिटॅमिनabcd तसेच कॅल्शियम फॉस्फरस पोटॅशियम लोह तसेच भरपुर फायबर ओमेगा३ फॅटी एँसिड असते म्हणुन आपल्या सर्वांच्याच आहारात मोड आलेल्या कडधान्याचा वापर सतत असला पाहिजे चला तर आज अशाच मोड आलेल्या कडधान्याचेच सॅलड आज आपण बघुया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

५-१० मिनिटे
२-३ जणांसाठी
  1. 1टोमॅटो
  2. 2मिरच्या
  3. 1-2 टेबलस्पुनकैरीच्या बारीक फोडी
  4. 1 टेबलस्पुनकोथिंबिर
  5. 1 टीस्पूनलिंबाचा रस
  6. 1 टीस्पूनचाट मसाला
  7. १०० ग्रॅम मिक्स मोड आलेली कडधाने( मुग, मटकी, चवळी, चणे
  8. 1-2मध्यम आकाराचे कांदे
  9. चविनुसारमीठ
  10. 1 टीस्पूनतेल

कुकिंग सूचना

५-१० मिनिटे
  1. 1

    प्रथम मिक्स कडधान्य७-८ तास पाण्यात भिजत ठेवा नंतर उपसुन कॉटनच्या रुमालात बांधुन ठेवा उन्हाळयात त्यांना लवकर मोड येतील नंतर त्यांना उकडुन घ्या

  2. 2

    कैरी साल काढुन बारीक कापुन ठेवा तसेच मिरच्या व कोथिंबीर ही चिरून ठेवा कांदा व टोमॅटो बारीक चिरून ठेवा

  3. 3

    ऐका वाटी मध्ये उकडलेले मोड आलेले कडधान्य घ्या त्यात चिरलेला कांदा टोमॅटो कैरी कोथिंबीर मिक्स करा सर्व साहित्य चमच्याने ऐकत्र करा

  4. 4

    नंतर त्यात लिंबाचा रस चाटमसाला व मीठ मिक्स करा

  5. 5

    फोडणी पात्रात तेल गरम करून त्यात बारीक चिरलेल्या मिरच्या व हिंग टाकुन हि फोडणी वरील मिश्रणावर ओता व मिक्स करा

  6. 6

    आपले तयार चटपटीत मोड आलेल्या कडधान्याचे सॅलड कोबीच्या पानात सर्व्ह करा बाजुने टोमॅटोच्या स्लाइज व कैरीचे काप लावा आजुबाजुला उकडलेली कडधान्ये पसरवता येतील तसेच कैरी चाट मसाला लिंबाची फोड देता येईल

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

टिप्पण्या

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
धन्यवाद सुप्रिया, प्रिती ताई🙏

Similar Recipes