चीझी चॉकलेट सँडविच (cheese chocolate sandwich recipe in marathi)

सरिता बुरडे
सरिता बुरडे @cook_25124896

#GA4 #week3 #सँडविच
गोल्डन एप्रोन 4 च्या पझल मधील सँडविच हा की-वर्ड ओळखून मी लहान मुलांना आवडेल अशी सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी बनविली आहे.
चॉकलेट म्हणजे अबाल-वृद्धांना आवडणारा पदार्थ. चॉकलेट खायला आवडत नाही अशी व्यक्ती आपल्याला शोधूनही सापडणार नाही. चॉकलेटचं साधं नाव जरी घेतलं तरी प्रत्येकाच्याच तोंडाला पाणी सुटतं. परंतु चॉकलेट केवळ खाण्यासाठी नसून त्याचे काही गुणधर्मही आहेत जे शरीरासाठी गुणकारी ठरतात. हृदयासाठी चॉकलेट फायदेशीर असते. चॉकलेट खाल्ल्याने स्ट्रेस कमी होतो तसेच स्मरणशक्ती आणि रोग प्रतिकारशक्ती ही वाढण्यास मदत होते. चॉकलेटमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स खूप प्रमाणात असतात त्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. अश्या या गुणकारी आणि यम्मी चॉकलेट पासून बनविलेली आजची रेसिपी मी शेअर करते आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 9ब्रेड स्लाईसेस
  2. 1 वाटीचॉकलेट क्रश
  3. 1 टेबलस्पून चॉकलेट सिरप
  4. 1 टेबलस्पून मिक्सफ्रुटस जॅम
  5. 1 टेबलस्पून बटर
  6. 1 टेबलस्पून चीझ
  7. 5-6चेरीस

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    सर्व प्रथम 3 ब्रेड्सच्या स्लाईसला बटर लावून घ्यावे.

  2. 2

    आता त्याच ब्रेड्सला जॅम लावून त्यावर चीझ किसून घ्यावे.

  3. 3

    दुसऱ्या तीन ब्रेड्सच्या स्लाईस वर चॉकलेट सिरप लावून घ्यावे आणि त्यावर चॉकलेट क्रश पसरवून घ्यावे.

  4. 4

    जॅम लावलेल्या ब्रेडवर चॉकलेट सिरप लावलेली ब्रेड ठेवून त्यावर आणखी एक ब्रेडची स्लाईस ठेवून 3 लेयर बनवून घ्यावे. वरून लावलेल्या ब्रेडच्या स्लाईसला थोडे बटर लावून घ्यावे. गॅसवर पॅन ठेवून त्यावर ब्रेड्स ठेवून गोल्डन-ब्राऊन होईपर्यंत शेकून घ्यावे.

  5. 5

    एका प्लेटमध्ये काढून सर्व ब्रेड्स मधोमध कापून घ्यावे आणि त्यावर चॉकलेट सिरप लावून घ्यावे.

  6. 6

    त्यानंतर त्यावर चीझ किसून चॉकलेट क्रश पसरवून घ्यावे. चेरीस ने सजवून सर्विंग प्लेटमध्ये काढून सर्व्ह करावे. आपले चीझी चॉकलेट सँडविच रेडी आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
सरिता बुरडे
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes