हिरव्या मुगाच्या डाळीचा पौष्टिक डोसा (green moong dosa recipe in marathi)

rucha dachewar
rucha dachewar @cook_26177680

आजची रेसिपी ही एक हेल्दी रेसिपी आहे. करायला एकदम सोपी आणि चवीला खूपच छान. मी नेहमी तांदूळ, उडदाची डाळ, रवा डोसा नेहमी करते. आपल्या जेवणात प्रोटीन्स चे महत्व सर्वांनाच माहित आहे, आणि आत्ताच्या काळात पौष्टीक आहार घेणे गरजेचे आहे. मुगडाळ डोसा
हा झटपटीत होणारा नाश्त्याचा प्रकार आहे. मूग डाळ डोशाचे पीठ पीठ आबवण्याची गरज नसते. मूग डाळ डोसा हा पौष्टिक, स्वादिष्ट आणि हेल्दी नाष्टा आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३०मिनिटे
  1. 1 वाटीहिरव्या मुगाची डाळ
  2. 1/2 वाटीरवा
  3. 1/2 वाटीशिल्लक राहिलेला भात
  4. 4-5 हिरव्या मिरच्या
  5. 1/2 वाटीकोथिंबीर
  6. 1 टेबलस्पूनजिरे पावडर
  7. चवीपुरतं मीठ
  8. 1 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

३०मिनिटे
  1. 1

    प्रथम मुगाची डाळ स्वच्छ धुऊन दोन तास पाण्यात भिजत घालावी. आणि पाच सहा तास फ्रीजमध्ये ठेवावी. डाळ. भिजल्या नंतर चाळणीत उपसून ठेवावी. मिक्सरच्या भांड्यामध्ये रात्री उरलेला शिल्लक भात आणि रवा टाकून मिक्सर मधून बॅटर फिरवून घ्यावे.(टीप, खोबरे दलियाच्या चटणीची रेसिपी या पूर्वी प्रकाशित केली आहे,)

  2. 2

    प्रथम मिक्सर मधून भात आणि अर्धे मुगाच्या डाळ पेस्ट करून घ्यावी..त्या मध्ये रवा,उरलेली मुगाची डाळ, हिरवी मिरची, कोथिंबीर,मीठ,जीरा पावडर मिक्सर मधून पेस्ट करून घ्यावी.वरील सर्व साहित्य एकत्र करून डोस्याचे बॅटर तयार करून घ्यावे

  3. 3

    आता गॅस सुरू करावा व गॅस वर तवा ठेवावा. तव्यावर सर्व बाजूने तेल लावावे. व तव्यावर बटर एका पळीने एकसारखे पसरवावे. डोसा दुसऱ्या बाजूने सुद्धा लालसर रंग होईपर्यंत भाजून घ्यावा.

  4. 4

    अश्याच प्रकारे सर्व डोसे तयार करावे. मुगाच्या हिरव्या डाळीचे पौष्टिक, स्वादिष्ट व कुरकुरीत डोसे तयार झालेले आहे. प्लेटमध्ये दलिया खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
rucha dachewar
rucha dachewar @cook_26177680
रोजी

Similar Recipes