हिरव्या मूगाचे डोसे (green moong dosa recipe in marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

#GA4 #week3 पझल मधील डोसा पदार्थ.
रेसिपी-3 डोसा अनेकप्रकारे केला जातो. मी हिरव्या मूगाचे डोसे नेहमी करते. पौष्टिक आहे.

हिरव्या मूगाचे डोसे (green moong dosa recipe in marathi)

#GA4 #week3 पझल मधील डोसा पदार्थ.
रेसिपी-3 डोसा अनेकप्रकारे केला जातो. मी हिरव्या मूगाचे डोसे नेहमी करते. पौष्टिक आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

3-4 जणांसाठी
8-10 मिनिटे
  1. 1/2 कपहिरवे मुग
  2. 1/2 कपतांदूळ
  3. 4-5हिरव्या मिरच्या. आवडीनुसार कमीजास्त करु शकता
  4. 4-5लसूण पाकळ्या
  5. 2 टीस्पूनथोडी कोथिंबीर
  6. 1 टीस्पूनमीठ

कुकिंग सूचना

3-4 जणांसाठी
  1. 1

    हिरवे मूग व तांदूळ स्वच्छ धुवून वेगवेगळे भिजत घालावे. चार-पाच तास तरी भिजत घालावे.

  2. 2

    हिरवे मूग व तांदूळ यातील पाणी निथळून घ्यावे. मिक्सरच्या भांड्यात हिरवे मुग, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लसूण पाकळ्या घालुन बारीक वाटून घ्यावे.

  3. 3

    मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले तांदूळ घालून वाटून घ्यावे.

  4. 4

    वाटलेल्या डाळीचे मिश्रण व तांदळाचे वाटलेले मिश्रण एकत्र चांगले मिक्स करून घ्यावे.मीठ घालून हलवून घ्यावे.

  5. 5

    गॅसवर पॅन गरम करत ठेवावा. गॅस मंद आचेवर ठेवून,चमच्याने मिश्रण घालून पसरवून घ्यावे. दोन्ही बाजूने चांगला भाजून घ्यावा.

  6. 6

    ओल्या नारळाची चटणी करून घ्यावी. त्यासोबत डोसे खूप छान लागतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes