दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)

Pranjal Kotkar
Pranjal Kotkar @PUK260176
19/4 Sagar sannidhaya Rahiwasi Chawl, Mahim Causeway, Mum-16.

#GA4 #week6.
गोल्डन एप्रन 4-Crossword Puzzle 6 मध्ये एक कीवर्ड हलवा शोधून, मी दुधी भोपळ्याचा हलवा केला.

दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)

#GA4 #week6.
गोल्डन एप्रन 4-Crossword Puzzle 6 मध्ये एक कीवर्ड हलवा शोधून, मी दुधी भोपळ्याचा हलवा केला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25-30 मि
2 सर्व्हिंग्ज
  1. 2कप कोवळा दुधी भोपळ्याचे कीस
  2. 1/4कप साखर (एकूण 6 टेबलस्पून)
  3. 1/2कप दूध (मी गोकुळ दूध वापरले)
  4. 1टेबलस्पून साजुक तुप
  5. 2टेबलस्पून मिल्क मसाला पावडर
  6. 1टीस्पून वेलची पूड

कुकिंग सूचना

25-30 मि
  1. 1

    दुधी बिनबियांचा तसेच कोवळा विकत घ्यावा.
    दुधी भोपळ्याची वरची सालं काढायची. मधोमध कापून त्यातील बिया काढून टाकाव्यात आणि दुधी किसून, कीस पाण्यात भिजवून ठेवावा. दूध उकळून थंड करून ठेवा. खवा नसल्याने, मी गोकुळ दूध वापरले कारण दूध उकळून थंड झाल्यावर त्यावर थोडीशी साय येते. सुरुवातीला तुपात 2 टेबलस्पून दूध घालताना मी त्यात दूधाची साय घेतली.

  2. 2

    जाड बुडाच्या पातेल्यात तूप आणि 2 टेबलस्पून दूध घालून हे भांडे मध्यम आचेवर गरम होण्यास ठेवावे. एक मिनिटाने पाण्यातून किसलेला दुधी चांगला पिळून त्या पातेल्यात टाकावा. सर्व चांगले एकत्र
    करून आणि दोनचार मिनीटे मध्यम आचेवर परतावा. नंतर त्यात उरलेल् 1/2 कप दूध घालावे आणि मध्यम आचेवर पातेले झाकून शिजू द्यावे. मधेमधे ढवळावे.

  3. 3

    दूध आटले कि दुधी व्यवस्थित शिजला आहे कि नाही ते पाहावे. लागल्यास 1 टेबलस्पून दूध घालावे.  थोड्यावेळानंतर साखर (तुमच्या गोड चवी नुसार थोडस साखर वाढवू शकता), वेलचीपूड, काजू/बदामाचे/ पिस्ता काप किंवा मिल्क मसाला पावडर घालून ढवळावे. आच मध्यम ठेवावी.

  4. 4

    साखर वितळेल आणि दुधी हलवा घट्ट होईल. एकदम छान घट्ट झाले कि गॅस बंद करावा.
    हलवा गरम किंवा गार कसाही छान लागतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pranjal Kotkar
Pranjal Kotkar @PUK260176
रोजी
19/4 Sagar sannidhaya Rahiwasi Chawl, Mahim Causeway, Mum-16.

Similar Recipes