पनीर दो प्याजा (paneer do pyaja recipe in marathi)

Amol Patil
Amol Patil @cook_25490541

#GA4 #week6

#paneer
#पनीरदोप्याजा
ढाबा स्टाईल पनीर दो प्याजा

पनीर दो प्याजा (paneer do pyaja recipe in marathi)

#GA4 #week6

#paneer
#पनीरदोप्याजा
ढाबा स्टाईल पनीर दो प्याजा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30-40 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. ग्रेव्ही साठी
  2. 3टॅबलस्पून तेल
  3. 1 टीस्पूनजिरं
  4. 4-5काळीमिरी
  5. 2-3लवंगा
  6. 3-4हिरवी वेलची
  7. 4मध्यम बारीक चिरलेले कांदे
  8. 1 टीस्पूनमिर्चीपूड
  9. 2 टीस्पूनधनेपुड
  10. 1/2 टीस्पूनजिरेपूड
  11. 1/4 टीस्पूनहळद
  12. 2शिमला मिरची
  13. 3बारीक चिरलेले टमाटे
  14. पाणी आणि मीठ अंदाजे
  15. पनीर दो प्याजा
  16. 2 टेबलस्पूनतेल
  17. 2मध्यम आकाराचे चिरलेले कांदे (बारीक चिरलेले नसावेत)
  18. 1 टीस्पूनअदरक लसूण पेस्ट
  19. 200 ग्रॅमपनीर
  20. 1/2-3/4 कपतयार ग्रेव्ही
  21. 2 टेबलस्पूनकोथिंबीर

कुकिंग सूचना

30-40 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम आपण ग्रेव्ही तयार करून घ्या. त्यासाठी आपण एका पॅन मध्ये 3 टेबलस्पून तेल घेऊन त्यात काळीमिरी, लवंग आणि हिरवी वेलची घाला. थोडा त्याचा सुगंध दरवळल्यानंतर त्यात जिरं घालून नंतर कांदा घाला.

  2. 2

    कांद्याला थोडा गुलाबी रंग आल्यानंतर त्यात टोमॅटो आणि शिमला मिरची घाला. (कापलेले थोडे 5-7 तुकडे टॉमेटो आणि शिमला मिरची बाजूला काढून ठेवा) नंतर त्यात मिर्चीपूड, धनेपूड, जिरेपूड आणि हळद घाला. नंतर त्यात अर्धा कप पाणी घाला. त्यावर झाकण ठेवून थोड्यावेळ शिजवून घ्या.

  3. 3

    आपल मिश्रण तयार झाल्यानंतर थंड होण्यासाठी ठेवा. नंतर मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्या.

  4. 4

    नंतर दुसऱ्या पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल घाला. त्यात थोडं जिरं आणि कांदा घालून गुलाबी होऊ द्या. बाजूला काढुन ठेवलेले टोमॅटो आणि शिमला मिरची टाका. नंतर पनीर टाका. पनीर लाल होऊ द्या.

  5. 5

    नंतर तयार केलेली प्युरी (ग्रेव्ही) घाला. चवी नुसार मीठ घाला आणि 4-5 मिनिटं मध्यम आचेवर होऊ द्या. आपल पनीर दो प्याजा तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Amol Patil
Amol Patil @cook_25490541
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes