चिकन फ्राईड राइस (chicken fried rice recipe in marathi)

Pranjal Kotkar
Pranjal Kotkar @PUK260176
19/4 Sagar sannidhaya Rahiwasi Chawl, Mahim Causeway, Mum-16.

#GA4 #week15
गोल्डन एप्रन 4 -आठवडा 15 क्रॉसवर्ड कोडे चे कीवर्ड Chicken शोधून. " चिकन फ्राईड राइस " बनवले.

चिकन फ्राईड राइस (chicken fried rice recipe in marathi)

#GA4 #week15
गोल्डन एप्रन 4 -आठवडा 15 क्रॉसवर्ड कोडे चे कीवर्ड Chicken शोधून. " चिकन फ्राईड राइस " बनवले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

2/3 सर्व्हिंग्ज
  1. 1-1/2कप तांदूळ
  2. आवश्यकतेनुसार पाणी तांदूळ शिजवून घेण्यासाठी
  3. 250ग्रॅम चिकन चे तुकडे
  4. १/2 टीस्पून मिरपूड चिकन मॅरिनेड साठी
  5. 2टीस्पून आले-लसूण पेस्ट चिकन मॅरिनेड साठी
  6. 1-1/2टीस्पून लाल तिखट चिकन मॅरिनेड साठी
  7. 2मोठे अंडी
  8. 1गाजराचे पातल लांब तुकडे कापून
  9. 150ग्रॅम कोबी (लांबट तुकडे कापून)
  10. 1स्प्रिंग-कांदा बारीक चिरलेला
  11. 2टीस्पून लाल तिखट
  12. 1/2टीस्पून मिरपूड
  13. 2टीस्पून सोया सॉस
  14. 4टेबलस्पून शेचेवान चटणी
  15. मुठभर चिरलेली कोथिंबीर
  16. आवश्यकतेनुसार तेल
  17. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

  1. 1

    तांदूळ 1 तास पाण्यात भिजवा. नंतर तांदूळ निथळून घ्या आणि आवश्यकतेनुसार पाणी, चवीनुसार मीठ घालून ते 90% पर्यंत मध्यम आचेवर ठेवून शिजवा. भात शिजवल्यावर कागदाच्या टॉवेलवर किंवा plate वर पसरवून ठेवा. भात पूर्ण पणे न शिजवता फक्त 90% शिजवून घ्या.

  2. 2

    मसाला घालून चिकन फ्राय करा :-
    चिकनला चौकोनी तुकडे करा आणि त्यात मीठ, 1 ते दीड टी-स्पून लाल तिखट, आले-लसूण पेस्ट आणि 1/2 टी-स्पून मिरपूड, घालून चांगले मिक्स करून 20-25 मिनिटे मॅरीनेट करून घ्या. कढईत 6 टेबलस्पून तेल गरम करा आणि चिकनचे चौकोनी तुकडे सोनेरी व कुरकुरीत होईपर्यंत तळा. नंतर हे तळलेले तुकडे प्लेट्स मध्ये काढून बाजूला ठेवा. तळून झाल्यावर उरलेल् तेल अंडी आणि भाज्या फ्राय करण्याकरिता घ्यावे.

  3. 3

    अंडी स्क्रॅमबल करण्याकरिता:- आता ज्या कढईत चिकन फ्राय केले, त्या कढईत 1 टेबलस्पून तेल गरम झाले कि त्यात अंडी फोडून टाका, चिमूटभर मीठ घाला. नंतर प्लेटमध्ये स्क्रॅम्बल केलेले अंडी काढून घ्या.

  4. 4

    पॅनमध्ये 3-4 टेबलस्पून तेल गरम करून त्यात भाज्या घाला - गाजर, कोबी, स्प्रिंग-कांदा. भाज्या परतून त्यात 2 टी-स्पून लाल तिखट, 1 टी-स्पून सोया सॉस घालावे.

  5. 5

    नंतर त्यात चवीनुसार मीठ मिक्स करावे. कमीतकमी 80% भाज्या झाकण ठेवून शिजवून घ्या.

  6. 6

    नंतर शिजवलेला भात, स्क्रॅमबल्ड अंडी आणि तळलेले चिकन तुकडे घालून अगदी हळूवारपणे आणि काळजीपूर्वक मिसळा. तांदूळ फोडू नका.

  7. 7

    मिक्स झाल्यावर त्यात 1/2 टी-स्पून मिरपूड, शेचेवान चटणी, पुन्हा 1 टी-स्पून सोया साॅस घालून, चांगले मिसळून घ्यावे. वरून चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करा.

  8. 8

    स्वादिष्ट चिकन फ्राईड राइस सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pranjal Kotkar
Pranjal Kotkar @PUK260176
रोजी
19/4 Sagar sannidhaya Rahiwasi Chawl, Mahim Causeway, Mum-16.

Similar Recipes