पातीच्या लसणाचा ठेचा (paticha lasnacha thecha recipe in marathi)

पातीचा लसूण बाजारात क्वचित आढळतो.बाजारात गेल्यावर पातीचा लसूण दिसल्याबरोवर खरेदी करण्याचा मोह आवरला नाही. पातीच्या लसणामध्ये नवीन तांदूळ वाटून टाकल्यास लसणाचे आयते खूप चांगले राहतात. एखाद्या वेळेस भाजीचे नसेल आणि जेवणामध्ये ठेचा असेल तर जेवण खूप चांगले जाते मी पातीच्या लसणाचा ठेचा करत आहे.ठेचा भाकरी , पराठ्यासोबत,पूरी सोबत खूप छान लागतो.लसूण खाल्याने cholostrolआणि रक्तदाब नियंत्रित राहतो.त्यामुळे पतीच्या लसणाचा ठेचा करत आहे.
पातीच्या लसणाचा ठेचा (paticha lasnacha thecha recipe in marathi)
पातीचा लसूण बाजारात क्वचित आढळतो.बाजारात गेल्यावर पातीचा लसूण दिसल्याबरोवर खरेदी करण्याचा मोह आवरला नाही. पातीच्या लसणामध्ये नवीन तांदूळ वाटून टाकल्यास लसणाचे आयते खूप चांगले राहतात. एखाद्या वेळेस भाजीचे नसेल आणि जेवणामध्ये ठेचा असेल तर जेवण खूप चांगले जाते मी पातीच्या लसणाचा ठेचा करत आहे.ठेचा भाकरी , पराठ्यासोबत,पूरी सोबत खूप छान लागतो.लसूण खाल्याने cholostrolआणि रक्तदाब नियंत्रित राहतो.त्यामुळे पतीच्या लसणाचा ठेचा करत आहे.
कुकिंग सूचना
- 1
पातीचा लसूण स्वच्छ धुऊन कापून घ्यावा. ठेचा साठी लागणारे साहित्य एकत्र ठेवावे.
- 2
पातीचा लसूण,हिरव्या मिरच्या, कोथिंबीर,जिरे, मीठ, मिक्सर मध्ये छान,जिरे,कोथिंबीर,मीठ,सुके खोबरे मिक्सर मध्ये छान रवाळ पेस्ट करून घ्यावी. ठेचा एका बाउल मध्ये काढून घ्यावा.
- 3
कढई किंवा भांड्यामध्ये तेल गरम करायला ठेवावे. तेल कडक गरम झाल्यावर मोहरी आणि जिरे टाकावे.मोहरी तडतडल्यावर हिंग टाकावे. तेल कोमट झाल्यावर ठेच्या मध्ये तडका द्यावा. आणि अर्धा लिंबू पिळावा.
- 4
छान मस्त मराठमोळा झणझणीत ठेचा तयार झालेला आहे.भाकरी,भरीत,पराठा, पुरी,थालिपीठ सोबत खायला खूप छान लागतो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
लाल मिरचीचा ठेचा (lal mirchi cha thecha recipe in marathi)
महाराष्ट्रामध्ये जेवणामध्ये ठेचा,कोशिंबीर,चटणी , सलाड असल्याशिवाय जेवणाचे ताट अपूर्ण वाटते प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे केला ठेचा केला जातो.. ज्वारीची भाकरी.आणि भरीत या सोबत ठेचा असला की जेवणाची मजा काही औरच असते.त्यामुळे लाल मिरचीचा ठेचा करत आहे. rucha dachewar -
खोबरे डाळ्याची चटणी (Khobre Dalyachi Chutney Recipe In Marathi)
आपल्या महाराष्ट्रात जेवणामध्ये चटणी,कोशिंबीर, सलाद जेवणामध्ये ठेवायची पद्धत आहे. जेवणामध्ये चटण्या नसेल तर जेवणाची प्लेट चांगली वाटत नाही.आज मी सुके खोबरे आणि दलिया ची चटणी दही टाकून करत आहे. ही चटणी,डोसे, वडे,इडली, आप्पे किंवा कोणत्याही पराठ्या बरोबर खायला देता येते. व बनायला पण खूप सोपी आहे. rucha dachewar -
मराठमोळा हिरवी मिरची ठेचा (mirchi thecha recipe in marathi)
हिरवी मिरची ठेचा अतिशय लोकप्रिय आपल्या महाराष्ट्रात आहे....आणि हा आपल्या सगळ्यांच्या घराघरात पसंत केला जातो...घरी जर अवेळी भूक लागली असेल तर, भाजीच नसेल तर पोळी सोबत हा ठेचा अतिशय सुंदर लागतो,,,मला तर हा खूप जास्त आवडतो...मी नेहमी हा ठेचा करून ठेवते, जेवणामध्ये जर असला की जेवण छान होते... Sonal Isal Kolhe -
पातीच्या लसणाचे आयते (patichya lasnache aayte recipe in marathi)
पातीच्या लसणाचे आयते करत आहे. हिवाळ्यात पातीचा लसूण सहज उपलब्ध होतो. पातीच्या लसणामध्ये नवीन तांदूळ टाकून आयते केले आहे. rucha dachewar -
लसूण, खोबरे,शेंगदाण्याची चटणी (lasun khobre shengdana chutney recipe in marathi)
#GA4 #week4मधील थीम नुसार लसूण,खोबरे,शेंगदाण्याची चटणी करत आहे.रोजच्या जेवणामध्ये वरण,भात,भाजी चपाती बरोबर तोंडी लावायला चटणी असेल तर जेवणाची मजा काही निराळी असते.प्रवासामध्ये ही चटणी सोबत घेवून जात येते.दोन ते तीन दिवस सहज टिकते. rucha dachewar -
पालक पुरी (palak puri recipe in marathi)
पालेभाज्या खायला मुले कंटाळा करतात. त्या मुळे पालकची प्युरी करून पालक पुरी केली तर पालेभाज्यांचा पण दैनंदिन जेवणामध्ये किंवा नाश्त्यामध्ये मी समावेश करते.पालक ही भाजी पौष्टिक असते.प्रथिने,लोह,, विटामिन युक्तअसते. दररोज जेवणामध्ये पालेभाज्यांचा समावेश केल्यास डोळे चांगले राहतात..म्हणून पालक पूरी नाश्त्याला करत आहे. rucha dachewar -
पातीच्या कांद्याचा झुणका (patichya kandyacha jhunka recipe in marathi)
#GA4 #week11#पातीच्या कांद्याचा झुणका#पातीचा कांदा हा keyword नुसार पातीच्या कांद्याचा झुणका करत आहे. बेसनाचे वेगवेगळे प्रकार आहेत,मेथी,काकडी, कांद्याचा,कोबी, सिमला मिरची पासून बेसन बनवता येते.हिवाळ्यात पातीचा कांदा सहज उपलब्ध होतो त्यामुळे पातीच्या कांद्याचा झुणका करत आहे.भाकरी आणि ठेचा सोबत खूप छान लागतो. rucha dachewar -
लाल मिरचीचा ठेचा (lal mirchi thecha recipe in marathi)
#GA 4#week4# chutanyविदर्भात भाकरीसोबत लाल किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा, त्यावर तेल आणि सोबत फोडलेला कांदा, हे असल्याशिवाय खेड्या मध्ये जेवण जात नाही... पूर्वीच्या काळी भाज्यांचे प्रमाण कमी असल्यामुळे लाल किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा याचा जास्त वापर होत होता! परंतु आता तोंडी लावणे म्हणून हा ठेचा ...खूप चविष्ट होतो हा ठेचा..तर बघूया... चटणीचा प्रकार... Varsha Ingole Bele -
वांग्याचे भरीत (wangyache bharit recipe in marathi)
आज मी वांग्याचे भरीत करत आहे. पातीचा कांदा,मटार ,टोमॅटो,हिरव्या मिरच्या टाकलेले हे भरीत ज्वारीच्या भाकरी बरोबर ठेचा किंवा कोशिंबीर बरोबर खाल्ले तर जेवणाची मजा काही निराळीच असते. rucha dachewar -
भेंडीचा ठेचा (bhendicha thecha recipe in marathi)
कितीतरी वेगवेगळ्या प्रकारे आपण भेंडी करतो .आज मी भेंडीचा ठेचा करून पाहिला .एकदम मस्त झणझणीत ठेचा भाकरीसोबत मस्त लागला. Preeti V. Salvi -
-
हिरव्या मिरचीचा ठेचा (hirvya mirchicha thecha recipe in marathi)
#ठेचा#डवीबाजू... ठेचा तसे सगळ्यानच्या घरी बनवलया जातो.. अणि सगळ्यांचीच एक स्पैशल रेसिपी असते.. तशीच थोड्या वेगळ्या टच ची माझी हे रेसिपी. Devyani Pande -
लसुन पातीचा ठेचा शेंगदाण्याची चटणी (lasun paticha thecha shengdyanyachi chutney recipe in marathi)
#GA4#week24#Lasoon/Garlic*लसणाच्या हिरव्या पातीचा ठेचा/ खर्डा आणि शेंगदाण्याची चटणी*आपल्या मराठी माणसांच्या जेवणात शहरापासून ते ग्रामीण भागातही ताटातली डावी बाजू समर्थपणे सांभाळणारा, सर्वांच्या आवडीचा असा हा मिरचीचा ठेचा.(आमच्याकडे त्याला खर्डा म्हणतात.)पण हिवाळ्यात छान लसणाची हिरवीगार पात शेतात डोलू लागते आणि त्या ठेच्याची चव अगदी वेगळी आणि वर्षातले काहीच दिवस चाखायला मिळते.या ठेच्याचं आणि माझं वेगळंच नातं आहे.दरवर्षी थंडीच्या दिवसात हिरवागार लसणाच्या पातीचा खर्डा बनवून घरच्यांना खायला देणे आणि त्यांनाही आवडीने खाताना बघून समाधान वाटते. हा ठेचा चपाती भाकरी बरोबर खुप छान लागतो तसेच शेंगदाणे घातलेला ठेचा ही मस्त कुरकुरीत लागतो. Vandana Shelar -
ओल्या लसणीचा ठेचा(olya lasnachi thecha recipe in marathi)
#winterspecialओला लसुण फक्त हिवाळ्यातच मिळतो.तब्येतीसाठी खूप छान असतो.म्हणून हिवाळ्यातील माझी आवडती रेसिपी....ओल्या लसणीचा ठेचा......करुन पहा तुम्ही पण...,,, Supriya Thengadi -
पातीचा कांदा घालून वांग्याचे भरीत (paticha kanda ghalun kelele wangyache bharit recipe in marathi)
#GA4 #week11Green Onion म्हणजे हिरवा पातीचा कांदा किंवा ओला कांदा हा क्लु ओळखला... आणि तो वापरून वांग्याचे भरीत केले आहे.. Shital Ingale Pardhe -
तीळ खोबऱ्याचा ठेचा (til khobryacha thecha recipe in marathi)
#GA4#veek4आमच्या वाईमध्ये कृष्णाबाईचा उत्सव खूप मोठा असतो. त्यावेळी सात घाटावर सात दिवस प्रोग्राम असतात. त्यावेळी गाव जेवण असते. तेव्हा हा ठेचा करतात. 8दिवस छान राहतो. दिपाली महामुनी -
ओल्या लाल मिरचीचा ठेचा🤤🤤🌶️🌶️ (olya daal mirchicha thecha recipe in marathi)
हिवाळ्यात लाल मिरची भरपूर असते लाल मिरची चां ठेचा करावासा वाटला🌶️🌶️🌶️ Madhuri Watekar -
लसूण पातीचा झणझणीत ठेचा (खर्डा) (lasun paticha thecha reipe in marathi)
#GA4 #week24 थंडीच्या दिवसात भरपूर प्रमाणात मार्केटमध्ये लसूण पात येते . कमीत कमी वस्तूत व फटाफट होणारा हा ठेचा(खर्डा ) आहे. चाखल्यावर भन्नाट चव जिभेवर रेंगाळते. लसूण हार्ट साठी अतिशय गुणकारी आहे . लसूण अँटिऑक्सिडंट आहे . शेतकरी लोक तर शेतातच खुडून ताजा ताजा ठेचा किंवा खरडा बनवतात . हिरवीगार चटणी भाकरीला लावून खातात. त्यात तेल टाकलयास आणखी त्याची लज्जत वाढते . सोबत कांदा व शेंगदाणे असतात .तर लसुन पातीचा ठेचा किंवा खर्डा कसा बनवायचा ते पाहूयात ... Mangal Shah -
दोडक बटाटा ठेचा (Dodka Batata Thecha Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#बटाटा रेसिपी कुकस्नॅप चॅलेंजहि रेसिपी सुषमा कुलकर्णी यांच्या रेसिपी वरून कुकस्नॅप केली. ठेचा छान झाला सुषमा ताई. धन्यवाद. Sumedha Joshi -
मिरचीचा ठेचा/ दगडीत कुटलेला (mirchicha thecha recipe in marathi)
आमचे कुटुंब प्रचंड मिरच्या खाऊ! आम्हाला मिरची शिवाय जेवण ही कल्पनाच करवत नाही अर्थात हिरवी मिरची आणि ती ही तिखट हिरवी कंच दिसणारी! लोणचे, खमंग मिरची, ठेचा,खर्डा,भरली मिरची,दही मिरची काही तरी सोबतीला हवंच!मी हे करण्यात एकदम एक्सपर्ट! आज मी आपणास मी ज्या पद्धतीने ठेचा करते ते दाखवतेय.सर्वांना तो नक्कीच आवडेल. Pragati Hakim (English) -
मिरचीचा ठेचा (Mirchicha thecha recipe in marathi)
#cooksnape recipe,#मिरचीचा ठेचा# मी Supriya thengadi यांची रेसिपी ट्राय केली , कारण जेवणाची लज्जत डा०या बाजुला चटणी, ठेचा असेल तर मज्जाच मज्जा Anita Desai -
खान्देशी मिरची ठेचा (mirchi thecha recipe in marathi)
#KS4#खान्देशी झणझणीत मिरची ठेचा. बघा कसा करायचा तो. Hema Wane -
गावरान- झणझणीत हिरव्या मिरच्यांचा ठेचा (Gavran Hirvya Mirchicha Thecha Recipe In Marathi)
#GR2गावरान रेसीपी#हिरवी मिरची#ठेचा#लसूण Sampada Shrungarpure -
नागपुरी ठेचा (nagpuri thecha recipe in marathi)
#हिरवा ठेचा, हा माझ्या मिस्टरांचा विक पॉइंट .आज ठेचा भाकरी पिठलं आहे म्हटले तर स्वारी जाम खुश.पण त्यांच्या पद्धतीनेच हवा असतो मग काय ,बनवला की. Rohini Deshkar -
भेंडीचा ठेचा (bhendicha thecha recipe in marathi)
खूप चविष्ट आणि रूचकर. पिठले, भाकरी आणि भेंडीचा ठेचा. मस्त असा मेनू. Cook with Gauri -
मटकीची अंकुरित सलाद (matakichi ankurit salad recipe in marathi)
#GA4 #week11#मटकीची अंकुरित सलाद# स्प्राउट आणि पातीचा कांदा हा keyword नुसार मटकीची अंकुरीत सलाद रेसिपी केलेली आहे. मटकी मध्ये पातीचा कांदा,काकडी,टोमॅटो,मिरची आणि कोथिंबीर टाकून पौष्टिक सलाड केली आहे. जेवणामध्ये किंवा नाष्ट्यामध्ये खायला खूप छान लागते. आणि पचायला सुद्धा हलकी असते rucha dachewar -
झणझणीत हिरवी मिरची ठेचा (hirvi mirchi thecha recipe in marathi)
#ठेचाचटणी तर जेवणात हवीच .जेवणाची डडावीकडील बाजु हक्कानी सांभाळणारा पदार्थ म्हणजे चटणी..मग ती कोणतीही असु देत...म्हणून खास झणझणीत हिरव्या मिरचीची चटणी म्हणजेच ठेचा...तुम्ही ही करून बघा आणि जेवणाची लज्जत वाढवा. Supriya Thengadi -
लाल मिरचीचा ठेचा (lal mirchicha thecha recipe in marathi)
#GA4 #week6# टेस्टी लाल मिरची ठेचाकाही वेळेस आपल्याला खूप तिखट खायची इच्छा होते आणि आपण विचार करतो की काय बनवावे आणि तसाच विचार माझ्या मनात आला की काहीतरी तिखट खायची इच्छा झाली आणि मी पटकन विचार केला की चला आपण लाल मिरचीचा ठेचा बनवूया आणि तो मी बनवला आज मी लसुन आणि कांद्या बिना हा ठेचा बनवला आहे Gital Haria -
ठेचा (thecha recipe in marathi)
ठेचा ही एक महाराष्ट्रीयन रेसिपी आहे. ताटातील डावीकडचा पदार्थ (साईड डिश)आहे. हिरव्या मिरच्या , लसुण पासून बनवला जातो. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. झणझणीत पण तितकाच चविष्ट . ज्वारीच्या, बाजरीच्याभाकरी सोबत खूप छान लागतो. Ranjana Balaji mali -
ठेचा मसाला पराठा (thecha masala paratha recipe in marathi)
पराठा म्हणजे एकदम स्वादिष्ट.ठेचा पराठा हा पश्चिम महराष्ट्रात प्रसिद्ध आहे.एकदम करायला सोपी आणि झन झण ई तदह्या सोबत तर परफेक्ट.....#cpm7 Anjita Mahajan
More Recipes
टिप्पण्या