फोडणीची सोजी(दलिया) (fodnicha daliya recipe in marathi)

Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
Mumbai

फोडणीची सोजी
मस्त् गहू थोडे जाडसर दळून आणायचे.किंवा आजकाल मार्केट मधे सुद्धा मिळतात.पण तो दलिया फार जाड असतो.म्हणून घरचा दळलेला बरा...तर अशी ही सोजी खरच खूप पौष्टीक असते.आजारी लोकाना किवा बाळंतीणीला आपण देतो.खरच त्यामूळे खुप शक्ती भरून निघते.तर अशा या पौष्टीक सोजीची आपण रेसिपी बघु.मी ईतर वेळी नाश्ता म्हणून खाण्यासाठी केली आहे म्हणून मी कांदे टोमॅटो घातले आहे.otherwise तूम्ही skip करू शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनिटे
  1. 1 मोठी वाटी बारीक सोजी
  2. 2हिरव्या मिरच्या चिरून
  3. 1कांदा चिरून
  4. 1टोमॅटो चिरून
  5. 3-4कढीपत्ता
  6. 1 टीस्पूनलिंबूचा रस
  7. 1 टीस्पूनहळद
  8. 1 टेबलस्पून तिखट
  9. 1 टीस्पूनजिरे,मोहरी
  10. 1 टीस्पूनहिंग
  11. 1 टेबलस्पूनकोथिंबिर

कुकिंग सूचना

30मिनिटे
  1. 1

    प्रथम साहित्य घ्या.

  2. 2

    आता एका पॅन मधे तेल गरम करून त्यात मोहरी,जिरे,हिंग,कांदा,टोमॅटो,तिखट हळद,कढीपत्ता घालून फोडणी करा.

  3. 3

    छान परतल्यावर त्यात सोजी घाला.आणी पाचेक मिनिटे परता.

  4. 4

    आता छान परतून झाले की त्यात आवश्यकतेनुसार पाणी घाला.

  5. 5

    आता पाणी घातल्यावर त्याला छान दहा ते पंधरा मिनिटे वाफू द्या.आता छान वाफून तयार आहे.

  6. 6

    आता मस्त वरुन लिंबाचा रस,कोथिंबिर घालुन सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes