बटर नान (butter naan recipe in marathi)

Ashwinee Vaidya
Ashwinee Vaidya @cook_26089892

#GA4 #week6
बटर हे सगळ्यांनाच खूप आवडते. आजकाल तर ह्या बटरची क्रेझ जरा जास्तच वाढली आहे. पावभाजी, पिझ्झा, ब्रेड, पराठा, थालीपीठ रोटी, नान व कुलचा सगळ्यात बटर. असाच एक पदार्थ बटर नान मी आज केला आहे.

बटर नान (butter naan recipe in marathi)

#GA4 #week6
बटर हे सगळ्यांनाच खूप आवडते. आजकाल तर ह्या बटरची क्रेझ जरा जास्तच वाढली आहे. पावभाजी, पिझ्झा, ब्रेड, पराठा, थालीपीठ रोटी, नान व कुलचा सगळ्यात बटर. असाच एक पदार्थ बटर नान मी आज केला आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
3 माणसांसाठी
  1. 2 कपमैदा
  2. 1/2 कपदूध
  3. 4 टेबलस्पूनदही
  4. 1/2 टेबलस्पूनबेकिंग पावडर
  5. 1/2 टेबलस्पूनमीठ
  6. 1/2 टेबलस्पूनसाखर
  7. 2 टेबलस्पूनतेल
  8. 2 टेबलस्पूनबटर
  9. 1/2 कपपाणी

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    बटर नान साठी लागणारे सर्व साहित्य एका ठिकाणी घ्यावे. एका भांड्यात मैदा घ्यावा त्यात मीठ घालून घ्यावे.

  2. 2

    आता त्यात बेकिंग पावडर, साखर व तेल घालावे.

  3. 3

    सगळे मीक्स करून घ्यावे व त्यात दही घालून चांगले मीक्स करून घ्यावे. दूध घालून मिश्रण एकजीव करावे.

  4. 4

    पिठ छान मळून घ्यावे व 1 तास झाकून ठेवावे.

  5. 5

    1 तासाभराने पीठ छान फुलून येते. तेलाचा हात लावून हे पीठ छान मळून घ्यावे. एक गोळा घेऊन त्याची पोळी लाटून घ्यावी. पोळीला बटर लावून घ्यावे व त्याची घडी घालून पून्हा बटर लावून घ्यावे.

  6. 6

    त्रिकोणी घडी करावी. आता लाटून घ्यावी. लाटून झाल्यावर त्याला पाणी लावावे. गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवावा. पाणी लावलेली बाजू तव्यावर टाकावी. म्हणजे नान तव्याला चिकटून बसतो.

  7. 7

    1 मिनीटानंतर तवा गॅसवर उलटा धरावा. नान भाजला गेला की तव्यावरून सुटतो. असा खरपूस भाजलेला नान प्लेट मध्ये काढून त्यावर बटर लावून घ्यावे. छान पापूदे सुटलेला असा हा गरमागरम बटर नान खायला तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashwinee Vaidya
Ashwinee Vaidya @cook_26089892
रोजी

Top Search in

टिप्पण्या

Similar Recipes