उपवासाचा कोफ्ता पुलाव (upwasacha kofta pulao recipe in marathi)

Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386

#GA4
#week8
#ऊपवास
गोल्डन एप्रन मधील पुलाव हा की वर्ड पासुन आज सादर करतेय ऊपासाचा पुलाव.

उपवासाचा कोफ्ता पुलाव (upwasacha kofta pulao recipe in marathi)

#GA4
#week8
#ऊपवास
गोल्डन एप्रन मधील पुलाव हा की वर्ड पासुन आज सादर करतेय ऊपासाचा पुलाव.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 3/4 कपभगर
  2. 1/4 कपशिंगाडा पीठ
  3. 1/4 कपराजगिरा पीठ
  4. 1/4 कपशेंगदाणे कुट
  5. 1/4 कपलाल शेंगदाणे
  6. 1/4 कपदुधीचा कीस
  7. 1/2 टीस्पूनमीठ
  8. 1/2 टीस्पूनजीरे
  9. 3-4हिरव्या लाल मिरच्या
  10. 2 टी स्पूनसाजुक तुप
  11. शेंगदाणा तेल तळणाकरीता
  12. 2 टीस्पूनलिंबाचा रस
  13. 1 टीस्पूनसाखर
  14. 4-5कढीपत्ता पाने

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम भगर स्वच्छ धुऊन पाणी निथळत ठेवावे. दुसरीकडे थोड्या मिरच्या, जीरे व मीठ भरड कुटून घ्यावे. एका पराती मध्ये दुधीचा कीस,शिंगाडा पीठ, राजगिरा पीठ,शेंगदाणा कूट,मिरची भरड, थोडे मीठ एकत्र करून कणके सारखे भिजवून गोळा तयार करून घ्यावा.

  2. 2

    पाच मिनिटानंतर या गोळ्याचे लंबगोल आकाराचे कोफ्ते तळून घ्यावेत.

  3. 3

    आता कढईमध्ये साजूक तूप घेऊन गरम करावे. त्यामध्ये जीरे,चिरलेली मिरची व कढीपत्त्याची फोडणी करून घ्यावी. या फोडणीमध्ये भगर घालावी.थोडे मीठ घालून भगर छान परतून घ्यावी.खमंग परतल्यानंतर त्यामध्ये साधारण एक ते सव्वा पेला गरम पाणी घालावे. एकदा हलवून वाफेवर होऊ द्यावी. तीन-चार मिनिटानंतर त्यामध्ये लिंबू पिळावे व साखर ऍड करावी. भगर शिजण्याच्या मार्गावर आहे.त्यावेळी तळलेले कोफ्ते भगरी वर ठेवून एक वाफ घेऊन गॅस बंद करावा.उपासाचा कोफ्ता पुलाव तयार आहे बटाट्याच्या कोशिंबिरी सोबत सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386
रोजी

Similar Recipes