उपवासाचा ढोकळा (upwasacha dhokla recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#cooksnap # वैष्णवी दोडके # मी आज तुमची ही रेसिपी केली आहे. छान झाला आहे ढोकळा. मी त्याला वरून तडका दिलेला आहे...

उपवासाचा ढोकळा (upwasacha dhokla recipe in marathi)

#cooksnap # वैष्णवी दोडके # मी आज तुमची ही रेसिपी केली आहे. छान झाला आहे ढोकळा. मी त्याला वरून तडका दिलेला आहे...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिट
  1. 1 कपभगर
  2. 2 टेबलस्पूनसाबुदाणा
  3. 1/2 कपदही
  4. 2-3मिरच्या बारीक चिरून
  5. 1 इंचआले किसून
  6. चवीनुसारमीठ
  7. 1/4 टीस्पूनखाण्याचा सोडा
  8. गरजेनुसार पाणी
  9. भाजलेली जीरे पूड
  10. काळे मिरे पूड
  11. 1 टेबलस्पून तेल
  12. 1 टीस्पून जीरे
  13. 2-3हिरव्या मिरच्या उभ्या कापून
  14. कढीपत्ता
  15. 1 टीस्पूनसाखर
  16. 1लिंबाचा रस
  17. पाणी

कुकिंग सूचना

45 मिनिट
  1. 1

    सगळे जिन्नस एकत्र ठेवावे. भगर आणि साबुदाणा एकत्र किंचित जाडसर बारीक करून घ्यावे.

  2. 2

    एका भांड्यात बारीक केलेला भगर, त्यात दही, मिरची, आणि आल्याचा किस टाकावा. पाणी टाकावे. मिक्स करून 15*20 मिनिट झाकण ठेवून बाजूला ठेवावे.

  3. 3

    आता 15-20 मिनिटांनी ढोकळा मिश्रणात गरजेनुसार थोडे पाणी टाकावे. चवीनुसार मीठ आणि खाण्याचा सोडा टाकावा. मिक्स करून घ्यावे.

  4. 4

    आता ज्या भांड्यात ढोकळा करायचा आहे, त्याला आतून तेल लावून, त्यात तयार मिश्रण ओतावे. वरून थोडी जीरे पूड आणि मिरे पूड टाकावी.

  5. 5

    कुकरमध्ये, ढोकळा 8-9 मिनिट वाफवून घ्यावे. थोडा थंड झाल्यावर त्याला पाहिजे त्या आकाराचे काप करून घ्यावे.

  6. 6

    आता त्यावर तडका देण्यासाठी एका पॅनमध्ये तेल टाकून त्यात जीरे, कढीपत्ता, उभी कापलेली हिरवी मिरची, टाकावी. तडतडल्यावर, त्यात पाणी, टाकून,साखर टाकावी आणि लिंबू पिळावे. एक उकळी आल्यावर गॅस बंद करावा.

  7. 7

    आता हा तडका, तयार ढोकळा आहे, त्यावर टाकावा...उपवासाचा ढोकळा खाण्यासाठी तयार आहे. दही शेंगदाणा चटणी सोबत सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

टिप्पण्या

Similar Recipes