कॉर्न पुलाव (corn pulao recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#goldenapron3 20th week pulao ह्या की वर्ड साठी कॉर्न पुलाव बनवला. १०-१५ मिनिटात बनणाऱ्या आणि चविष्ट असणाऱ्या रेसिपी मला जास्त आवडतात, त्यापैकी एक ही रेसिपी.

कॉर्न पुलाव (corn pulao recipe in marathi)

#goldenapron3 20th week pulao ह्या की वर्ड साठी कॉर्न पुलाव बनवला. १०-१५ मिनिटात बनणाऱ्या आणि चविष्ट असणाऱ्या रेसिपी मला जास्त आवडतात, त्यापैकी एक ही रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५-२० मिनीटे
  1. 2 कप भात
  2. 1 कपउकडलेले कॉर्न
  3. 1कांदा
  4. 1शिमला मिरची
  5. 1गाजर
  6. 1/2 टेबलस्पूनबटर
  7. 1/2 टेबलस्पूनतेल
  8. 1/2 टीस्पूनजीरे
  9. 1 टेबलस्पूनआलं लसूण पेस्ट
  10. 1-2हिरव्या मिरच्या....आवडीनुसार
  11. 1टेजपत्ता
  12. 3-4लवंग
  13. 1 इंचदालचिनीचा तुकडा
  14. 6-7मिरे
  15. 1/2 टीस्पूनपुलाव मसाला
  16. 1/2 टीस्पूनमीठ....आवडीनुसार कमी जास्त
  17. 1/2 टेबलस्पूनलिंबाचा रस

कुकिंग सूचना

१५-२० मिनीटे
  1. 1

    भात शिजवून घेतला,कॉर्न उकडून घेतले.आलं,लसूण ठेचून घेतला,कांदा,शिमला मिरची,गाजर चिरून घेतले.लिंबाचा रस काढून घेतला.

  2. 2

    कढईत तेल आणि बटर घालून ते तापल्यावर त्यात जीरे घातले,नंतर कांदा छान परतला,आलं लसूण पेस्ट आणि खडे मसाले घालून परतून घेतले.

  3. 3

    नंतर त्यात चिरलेली शिमला मिरची,गाजर घालून नीट परतले.नंतर उकडलेले कॉर्न आणि पुलाव मसाला घालून परतून घेतले.

  4. 4

    आता त्यात शिजलेला भात मोकळा करून घातला. त्यात लिंबूरस पिळला आणि मीठ घालुन नीट मिक्स करून घेतले.५-७ मिनीटे मंद गॅसवर ठेवले.

  5. 5

    तयार पुलाव गरम गरम सर्व्ह केला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes