फ्लॉवर मटार भाजी (cauliflower matar bhaaji recipe in marathi)

Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
Vashi

#GA4 #week10
आज मी अगदी साधी आणि अगदी सोपी अशी लहान मुलांना आवडणारी फ्लॉवर मटार ची भाजी बनवली आहे. ही भाजी माझ्या नातवाला आणि मुलाला खूपच आवडते. ही भाजी बनवल्यावर मला त्यांचीखूप आठवण येते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
4 जणांसाठी
  1. 1मध्यम आकाराचा फ्लॉवर
  2. 1/2 कपमटार चे दाणे
  3. 4-5हिरव्या मिरच्या
  4. 1/2 टेबलस्पूनहळद
  5. 2-3 टेबलस्पूनतेल
  6. 1 टेबलस्पूनमीठ
  7. 2 टेबलस्पूनकोथिंबीर

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    फ्लॉवर स्वच्छ धुवून. बारीक चिरून घ्यावा. मटार सोलून धुवून घ्यावेत कोथिंबीर आणि मिरची धुवून चिरून घ्या.

  2. 2

    गॅसवर पॅन गरम करायला ठेवावा. त्यात तेल घालावे. तेल गरम झाल्यावर त्यात मिरची चे तुकडे टाकून परतावे मग त्यात फ्लॉवर मटार हळद आणि मीठ घालून ढवळून घ्यावे.

  3. 3

    गॅस मंद आचेवर ठेवावा. पॅनवर झाकण ठेवा. झाकणावर पाणी घाला. असं केल्यानी वाफेवर भाजी छान शिजते. भाजीत पाणी घालू नये.15-20मिनिटांनी भाजी शिजेल त्यावर कोथिंबीर पसरून भाजी गॅसवरून उतरवा. फ्लॉवर मटार भाजी तयार. वरण भाता बरोबर ही भाजी सर्व्ह करा. अशी भाजी असेल तर नक्कीच मुलं दोन घास जास्त जेवतील

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
रोजी
Vashi
मला पदार्थ बनवायला आणि खिलवायला आवडते.
पुढे वाचा

Similar Recipes