आवळ्याचे लोणचे (avala lonche recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#GA4 #week11 की वर्ड- आवळा
आज वैकुंठ चतुर्दशी... भगवान विष्णूंचे पूजन आणि आवळी पूजन म्हणजेच आवळ्याच्या झाडाचे पूजन आणि आवळी भोजन.. असे म्हणतात की आवळ्याच्या झाडाखाली श्री विष्णूंचे वास्तव्य असते.. म्हणून आवळ्याच्या झाडाचे पूजन आणि श्री विष्णूंचे पूजन आज केले जाते. लहानपणी आई मावशी आजी याबद्दल च्या गोष्टी आम्हाला नेहमी सांगायच्या. तेच तुम्हाला आता मी सांगते. घरोब्याचे संबंध असलेली गावातील चार-पाच घरातील बायका मुले मिळून आवळ्याच्या झाडाखाली जात असत.. झाडाखाली सगळी साफसफाई करुन मग आवळ्याच्या झाडाची पूजा करत. येताना बायका खाली अंथरायला चटया,बस्करे वगैरे आणत..तसेच आवळी भोजनासाठी दिवाळीचे फराळाचे पदार्थ शिरा पुऱ्या थालिपीठ वड्या असे पदार्थही घेऊन येत असत. पूजा झाल्यावर चटया अंथरून सगळया बच्चे कंपनीला पत्रावळीवर सर्वांनी आणलेले खायचे पदार्थ एकमेकांना वाटून अंगत पंगत केली जात असे खूप मजा यायची त्यावेळेस त्यांना.. मुलांचा पोटोबा भरला की स्त्रिया एकमेकांना वाढून घेत.. आणि गप्पा मारत हसत खेळत मनसोक्त आवळी भोजन करत.. त्याकाळी बायकांना हेच ते विसाव्याचे आणि आनंदाचे क्षण होते आणि स्त्रिया या क्षणांचा मनमुराद आनंद लुटत असत..
किती सुंदर कल्पना आहे ना आवळी भोजनाची.. तात्पर्याने निसर्गाच्या सान्निध्यात जाण्याची...निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची.. आपल्या संस्कृतीने निसर्गाची आणि देवा धर्माची किती सुरेख सांगड घातली आहे याचे मला नेहमीच आश्चर्य वाटते ‌..मला तर हे आवळी भोजन नेहमीच आवडायचे .. पण अजून कधी आवळी भोजनाचा योग आला नाही.. असो..
चला तर मग आपल्या रोजच्या भोजनात आवळ्याचा समावेश करून आपण घरीच आवळी भोजन करु या.. त्यासाठी आज आवळ्याचे लोणचे कसे करायचे हे पाहूया..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15-20 मिनीटे
4 जणांना
  1. 250 ग्रॅमआवळे
  2. 1 टीस्पूनमोहरी ची डाळ
  3. 2-3 टेबलस्पून कैरी लोणचे मसाला
  4. मीठ चवीनुसार
  5. 1 कपफोडणीसाठी तेल
  6. 1 टीस्पूनमोहरी
  7. 1/2 टीस्पूनहिंग
  8. 2 टेबलस्पूनगुळ

कुकिंग सूचना

15-20 मिनीटे
  1. 1

    प्रथम आवळे स्वच्छ धुऊन घ्यावेत आणि टॉवेलने कोरडे करून घ्यावेत. नंतर किसणीने किसून घ्यावेत.

  2. 2

    आता किसलेल्या आवळ्यामध्ये चवीनुसार मीठ घालून थोडावेळ मिश्रण तसेच ठेवून द्यावे नंतर त्यात लोणच्याचा मसाला, मोहरीची डाळ,गुळ घालून मिश्रण एकजीव करावे. आणि आणि झाकून ठेवावे म्हणजे मिश्रणाला थोडे पाणी सुटते.

  3. 3

    दुसऱ्या दिवशी कढईत तेल तापवून त्यात मोहरी घालावी मोहरी तडतडली कि हिंग घालून गॅस बंद करावा अशी खमंग फोडणी गार झाली की लोणच्यावर उतावली आणि लोणचे परत एकदा व्यवस्थित एकत्र करून घ्यावे. असे झाले आपले चटपटीत आवळ्याचे लोणचे तयार.

  4. 4

    असे हे खमंग चटपटीत आवळ्याचे लोणचे पोळी, भाता बरोबर तोंडी लावणे म्हणून खावे.

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes