कैरी मखाणा लोणचे (kairi makhana lonche recipe in marathi)

Archana bangare
Archana bangare @Archana2020

जेवणात लोणचे असले की दोन घास जरा जास्तच जातात.आज मी मखाणा लोणचे केले.अतिशय मस्त लागते.आणि एक पौष्टिक प्रकार पोटात जातो.कोवळे आंबे असल्यामुळे लवकरच खायला उपयोगी पडते.

कैरी मखाणा लोणचे (kairi makhana lonche recipe in marathi)

जेवणात लोणचे असले की दोन घास जरा जास्तच जातात.आज मी मखाणा लोणचे केले.अतिशय मस्त लागते.आणि एक पौष्टिक प्रकार पोटात जातो.कोवळे आंबे असल्यामुळे लवकरच खायला उपयोगी पडते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1/2 किलोकैरी
  2. 50 ग्राममोहरी डाळ
  3. 50 ग्रामरामबंधु लोणचे मसाला
  4. 1 टीस्पूनखडा हिंग
  5. 2 टेबलस्पूनतिखट
  6. 2 वाटीमीठ
  7. 250 ग्रामसरसों तेल
  8. 1बट्टी गुळ (ऐच्छिक)
  9. 1 टेबलस्पूनजाड सोप
  10. 1 टेबलस्पूनहळद

कुकिंग सूचना

  1. 1

    आंबे धुवून त्यांच्या फोडी करून घेतल्या.मोहरीची डाळ थोडी भाजून घेतली.हिंग बारीक वाटून घेतला.सोप भाजून जाडसर कुटून घेतली. सर्व साहित्य काढून घेतले.

  2. 2

    कढईत दोन टेबलस्पून तेल गरम करून हिंग घालून तेल थंड होऊ द्यावे.नंतर सर्व साहित्य तेलात मिक्स करावे.व आंब्याच्या फोडी घालून मिक्स करावे.एक दिवस तसेच मुरु द्यावे.दुसर्या दिवशी मीठामुळे जरा ओलसरपणा येतो.

  3. 3

    आता सरसोचे तेल एका भांड्यात गरम करायला ठेवले.आणि पुर्ण पणे थंड झाल्यावरच लोणच्यात घालावे.

  4. 4

    टिप --- लोणच्यात मीठ जरा जास्त घालावे.व फोडी बुडत पर्यंत तेल घालावे.मीठामुळे लोणचे खराब होत नाही.तेल तुम्हाला आवडेल ते घालावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Archana bangare
Archana bangare @Archana2020
रोजी

Similar Recipes