केरळ अवियल रेसिपी (kerala avilay recipe in marathi)

Deepali Surve
Deepali Surve @cook_25886474
India

#दक्षिण#केरळ-आज मी येथे दक्षिण केरळमधील अवियल रेसिपी बनवली आहे.

केरळ अवियल रेसिपी (kerala avilay recipe in marathi)

#दक्षिण#केरळ-आज मी येथे दक्षिण केरळमधील अवियल रेसिपी बनवली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
2 व्यक्तींसाठी
  1. 1शेवग्याची शेंग
  2. 1छोटे गाजर
  3. 1 छोटाबटाटा
  4. 1छोट्या वांगी
  5. 1छोटी वाटी फरसबी
  6. 1छोटी वाटी पापडी
  7. 1छोटी वाटी सुरण
  8. वाटीओले खोबरे
  9. 1 वाटीदही
  10. 1 चमचाजीरे
  11. 1/2 चमचामोहरी
  12. गरजेप्रमाणे तेल
  13. गरजेप्रमाणे कोथिंबीर
  14. गरजेप्रमाणे मीठ, हळद
  15. 3हिरवी मिरची
  16. 1 चमचाउडीदडाळ
  17. 8-9कढीपत्ता

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    प्रथम छोट्या कुकरमध्ये या सर्व भाज्या टाकल्या त्यामध्ये मीठ आणि हळद टाकून एक कप पाणी मिक्स केले. आणि हे सर्व मिक्स करून कुकरला याची एक शिट्टी काढली

  2. 2

    मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरे घेतले, त्यामध्ये एक चमचा जीरे घातले, तीन हिरव्या मिरच्या घातल्या,चवीप्रमाणे मीठ घालून हे सर्व मिश्रण बारीक केले. कुकर झाल्यानंतर त्यामध्ये हे खोबऱ्याचे बारीक केलेले मिश्रण घातले.आणि एक वाटी दही मिक्स केले आणि या सर्व मिश्रणाला एक उकळी आणली.

  3. 3

    तडका पॅन मध्ये दोन चमचे तेल घालून त्यामध्ये मोहरी कढीपत्ता उडदाची डाळ याचा तडका बनवून या मिश्रणावर घातला याप्रकारे केरळ अवियल तयार केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepali Surve
Deepali Surve @cook_25886474
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes