खजूर हलवा (khajur halwa recipe in marathi)

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
Navi mumbai
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

90 Minutes
तीन
  1. 250 ग्रॅमखजूर
  2. 2 टेबलस्पूनकॉर्न फ्लोअर
  3. 10काजू
  4. 1/2 कपतुप
  5. 1/2 चमचावेलची पावडर
  6. 1 कपगरम पाणी

कुकिंग सूचना

90 Minutes
  1. 1

    प्रथम पाव किलो खजूर घेतले. मग एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवले.

  2. 2

    एक कप पाणी गरम झाल्यावर त्यात खजुर घालून अर्धा तास भिजत ठेवले.

  3. 3

    नंतर भिजवलेले खजुर मिक्सर मध्ये वाटून घेतले. व पेस्ट करून घेतली.

  4. 4

    मग एका कढईत पाव वाटी तूप घालून, त्यात वाटून घेतलेली खजुराची पेस्ट घालून ती मंद गॅसवर ढवळत रहावे.

  5. 5

    मिश्रण घट्ट होईपर्यंत, म्हणजेच साधारण 15 मिनिटे शिजवून घेतले.

  6. 6

    मग एका वाटीत दोन चमचे कॉर्न फ्लोर घेवून त्यात एक कप गरम पाणी घालून ती पेस्ट वरील मिश्रणात घातली.

  7. 7

    मग एका छोट्या भांड्यात दोन चमचे तूप घालून त्यात काजू सोनेरी रंगावर भाजून घेतले व अर्धा चमचा वेलची पावडर घालून मिश्रण चांगले घट्ट होईपर्यंत परतून घेतले.

  8. 8

    मग वरील मिश्रण बटर पेपर लावलेल्या भांड्यात काढून घेतले. आणि त्यावर तळलेले काजू लावून ते भांडे जरा हलवून,15-20 मिनिटे बाजुला ठेवले. नंतर त्याचे धारदार सुरीने चौकोनी आकाराचे तुकडे करून घेतले. व फ्रीज मध्ये ठेवले. आणी खजुराचा हलवा सर्व्ह केला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
रोजी
Navi mumbai

टिप्पण्या

Similar Recipes