हेलथी ड्रायफ्रूटस / डिंक लाडू (healthy dryfruits recipe in marathi)

Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
India

#CookpadTurns4
#कुक विथ ड्रायफ्रूटस

अत्यंत असे हे पौष्टिक असे लाडू आहेत. थंडीत भरपूर प्रमाणात ऊर्जा देतात. तसेच शरीरा साठी अत्यंत गरजेचे आहे. लहान मुलांना 1 लाडू द्यावा, व मोठ्यांनी 2 लाडू हे दिवसातून खावे.
हे लाडू अश्या पद्धतीने केल्यास खाताना थोडे डिंका मुळे कुरकुरीत लागतात.

चला तर म ड्रायफ्रूटस लाडू ची रेसिपी बघू कशी करतात ती...

या प्रमाणात 40 ते 45 लाडू होतात.

हेलथी ड्रायफ्रूटस / डिंक लाडू (healthy dryfruits recipe in marathi)

#CookpadTurns4
#कुक विथ ड्रायफ्रूटस

अत्यंत असे हे पौष्टिक असे लाडू आहेत. थंडीत भरपूर प्रमाणात ऊर्जा देतात. तसेच शरीरा साठी अत्यंत गरजेचे आहे. लहान मुलांना 1 लाडू द्यावा, व मोठ्यांनी 2 लाडू हे दिवसातून खावे.
हे लाडू अश्या पद्धतीने केल्यास खाताना थोडे डिंका मुळे कुरकुरीत लागतात.

चला तर म ड्रायफ्रूटस लाडू ची रेसिपी बघू कशी करतात ती...

या प्रमाणात 40 ते 45 लाडू होतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
40 लाडू
  1. 150 ग्रॅमबदाम काप
  2. 50 ग्रॅमकाजू
  3. 7अक्रोड
  4. 100 ग्रॅमपिस्ते
  5. 7-8अंजीर
  6. 100 ग्रॅममनुका
  7. 2 कपखारीक पावडर
  8. 2 कपगूळ / चवी नुसार
  9. 2 कपगावरान तूप / आवश्यक तेनुसार
  10. 125 ग्रॅमडिंक
  11. 2 वाट्याखोबरं किस
  12. 1 टीस्पूनवेलची पावडर
  13. 1/2जायफळ पावडर
  14. 1 कपगव्हाचे पीठ

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    सगळे साहित्याची तयारी करून घ्या.

  2. 2

    खोबरं भाजून घ्यावे. डिंक थोडा थोडा तूपात घालून तळून घ्यावा.

  3. 3

    ड्रायफ्रूटस चे काप (काजू, बदाम, पिस्ते, अंजीर, अक्रोड, मनुका) तूपात खमंग भाजून घ्यावे. व मिक्सर चा भांड्यात घालून रवाळ भरड करावी.

  4. 4

    खारीक पावडर तूपात भाजून घ्या. आता डिंक थोडा मिक्सर मधे बारीक करून घ्या व थोडा तसाच ठेवा.

  5. 5

    गव्हाचे पीठ खमंग सोनेरी रंगावर भाजावे.

  6. 6

    आता खोबरं किस, डिंक बारीक केलेला, डिंक फुलवलेला, ड्रायफ्रूटस भरड, पिस्ता काप थोडे, वेलची जायफळ पावडर, गव्हाचे भाजून घेतलेले खमंग पीठ, खारीक पावडर सगळे जिन्नस एकजीव करावे.

  7. 7

    कढईत तूप घालून गूळ घालून तो वितळवून घ्यावा. (पाक करू नये, नाहीतर लाडू खूप कडक होतात) व कोंबट झाल्यावर वरील एकत्र मिश्रणात गाळून घाला. (म्हणजे गुळात काही खडे असल्यास ते गाळण्यात राहतात)

  8. 8

    गूळ घातलेले मिश्रण नीट हाताने एकजीव करावे

  9. 9

    तयार मिश्रणाचे लाडू वळून घ्यावे, लाडू सहज वळले जातात. व पोकळ होत नाहीत.

  10. 10

    व अश्या पध्दतीने सगळे लाडू बांधून घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
रोजी
India
Passionate about cooking. Like to learn more innovative recipes ...
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes