पालक पुरी रेसिपी (palak puri recipe in marathi)

Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg

#cpm6
#week6
#रेसिपीमॅगझिन

पालकामध्ये प्रथिने, लोह आणि पौष्टिक युक्त असणारी ही पालक... आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायी आहे. नियमित पालकाचे सेवन केल्याने हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. नुसतीच पालक घरातील लहान मंडळी खायला बघत नाही. पण ह्याच पालकाच्या प्युरी पासून आपण पालकपुरी तयार करून खाऊ घातली तर नक्कीच आवडीने खातात. चवीला अप्रतिम आणि तितकीच खुशखुशीत अशी ही पालक पुरी टिफिन मध्ये, प्रवासात नेण्यासाठी अगदी सोईस्कर...
चला तर मग करुया *पालकपूरी*... 💃 💕

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मिनिटे
चार व्यक्ती साठी
  1. 200 ग्रामपालक
  2. 1 कपगव्हाची कणीक
  3. 2 टेबलस्पूनबारीक रवा
  4. 2 टेबलस्पूनबेसन
  5. 1-2 टेबलस्पूनदही
  6. 1/2 टीस्पूनओवा
  7. चिमूटभरसाखर
  8. 1/2 टेबलस्पूनधनेपावडर, जिरापावडर
  9. 1/2 टेबलस्पूनआले लसुण पेस्ट
  10. 7-8हिरव्या मिरच्या + १/४ कप कोथिंबीर चा ठेचा
  11. 1 टेबलस्पूनतिळ
  12. चवीनुसारमीठ
  13. तळण्यासाठी तेल
  14. आवश्यकतेनुसार पाणी

कुकिंग सूचना

२५ मिनिटे
  1. 1

    पालक निवडून दोन-तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावी. त्यानंतर गरम पाण्यात घालावी व लगेच गरम पाण्यातून काढून, थंड पाण्यात टाकावी.

  2. 2

    आता पालक, मिरची, कोथिंबीर, आले लसून ची मिक्सर ला लावून प्युरी करून घ्यावी.

  3. 3

    या पालक प्युरी मध्ये रवा व सर्व मसाले घालून एकत्र करावे व त्यात मावेल तेवढेच गव्हाचे पीठ घालून पुरीसाठी जशी कणीक मळतो तशी कणिक मळून घ्यावी.

  4. 4

    मळलेल्या कणकेचे छोटे छोटे गोळे करून, त्याच्या पुऱ्या लाटून घ्याव्या. पुरी लाटताना कणकेचा वापर करू नये तेलाचा वापर करावा(असे केल्याने पुरीला कलर छान येतो)

  5. 5

    लाटलेल्या पुऱ्या गरम तेलामध्ये तळून घ्याव्यात.ह्या पालक पुर्‍या लोणच्या सोबत, चहासोबत सर्व्ह कराव्या. तेव्हा नक्की ट्राय करा *पालक पूरी*... 💃 💃 💕 💕

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes