कोबीचे पराठे (kobiche parathe recipe in marathi)

Priya Sawant
Priya Sawant @cook_21069391

कोबीचे पराठे (kobiche parathe recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनीटे
2 जणांसाठी
  1. 1 लहानकिसलेला कोबी
  2. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  3. 1/4 टीस्पूनहळद
  4. कोथिंबीर
  5. 2 कपकणीक
  6. पाणी आवश्यकतेनुसार
  7. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

३० मिनीटे
  1. 1

    १ कोबी किसून तो कपड्यात बांधून त्याचे पाणी काढून घ्यावे. हे पाणी कणीक मळताना वापरावे.

  2. 2

    कणीक मळून घ्यावे. मळताना कोबीचे पाणी वापरावे. १५ ते 20 मिनिटांसाठी झाकून ठेवावे.

  3. 3

    किसलेला कोबी मध्ये लाल तिखट हळद व कोथिंबीर घालून भाजी करून घ्यावी. भाजी थंड झाल्यावर त्यात चवीनुसार मीठ घालावे. आधी मीठ घातलं तर भाजीला पाणी सुटते.

  4. 4

    तयार कणकेचे गोळे करून घ्यावेत व कोबी ची भाजी स्टफ करून जाडसर पराठा लाटून घ्यावा.

  5. 5

    तवा गरम करून पराठा बटर किंवा तूप लावून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावा.

  6. 6

    गरम पराठे सॉस किंवा दही सोबत सर्व्ह करावेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Priya Sawant
Priya Sawant @cook_21069391
रोजी

Similar Recipes