मिसळ पाव (misal pav recipe in marathi)

Namita Patil
Namita Patil @namitapatil

#स्नॅक्स #साप्ताहिक स्नॅक प्लॅनर #मिसळ पाव
महाराष्ट्रीयन स्नॅक्समध्ये मिसळ पाव हा प्रकार खूप लोकप्रिय आहे. बऱ्याचवेळा नाश्ता आणि जेवण यांचा सुवर्णमध्य साधणारा सर्वात उत्तम मेनू . सध्या थंडीचा मौसम आहे, अशावेळी चमचमीत, तिखट, तर्रीदार अशी ही मिसळ बघूनच तोंडाला पाणी सुटते आणि अशावेळी न खाणारा खवय्या विरळाच!! आज मी ही अशीच झणझणीत मिसळीची रेसिपी देत आहे.

मिसळ पाव (misal pav recipe in marathi)

#स्नॅक्स #साप्ताहिक स्नॅक प्लॅनर #मिसळ पाव
महाराष्ट्रीयन स्नॅक्समध्ये मिसळ पाव हा प्रकार खूप लोकप्रिय आहे. बऱ्याचवेळा नाश्ता आणि जेवण यांचा सुवर्णमध्य साधणारा सर्वात उत्तम मेनू . सध्या थंडीचा मौसम आहे, अशावेळी चमचमीत, तिखट, तर्रीदार अशी ही मिसळ बघूनच तोंडाला पाणी सुटते आणि अशावेळी न खाणारा खवय्या विरळाच!! आज मी ही अशीच झणझणीत मिसळीची रेसिपी देत आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५-३० मि.
४-५ लोकांसाठी
  1. 1/2 फरसाण
  2. 3मोठे कांदे
  3. 2टोमॅटो
  4. 4मोठे चमचे कांदा लसूण मसाला
  5. 1 वाटीमोडाची मटकी
  6. 1बटाटा बारीक आप करून
  7. 2 चमचेमीठ
  8. वाटणासाठी मसाला
  9. 4मोठे कांदे
  10. 1 वाटीखोबरे
  11. 3 चमचेआओले खोबरे
  12. 1/4 वाटीलसूण
  13. 1 वाटीकोथिंबीर
  14. 2 इंचआले
  15. 2 चमचेपांढरे तीळ

कुकिंग सूचना

२५-३० मि.
  1. 1

    साहित्य

  2. 2

    प्रथम वाटणाच्या मसाल्यासाठी कांदा लांब कापून भाजूननंतर घेणे. खोबरे किसून भाजून घेणे. आले स्वच्छ धुवून चिरून घेणे. लसूण सोलून घेणे. कोथिंबीर धुवून चिरून घेणे. भाजलेल्या कांदा, खोबऱ्यातच आले, लसूण, कोथिंबीर घालणे. २ मिनिटे एकत्र भाजावे. गॅस बंद करावा, थंड झाल्यावर वाटून घेणे.

  3. 3

    आता रश्शाची फोडणी करावी. एका पातेल्यात ७-८ पळ्या जरा जास्तच तेल घालावे. हिंग, जिऱ्याची, कडीपत्त्याची फोडणी करावी. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालावा, अर्धवट कांदा भाजत आला की त्यात चिरलेला टोमॅटो टाकावा. ३-४ मि. परतवून घ्यावा. बटाट्याचे कापलेले काप व मटकी घालावी चांगली परतवून त्यात कांदा लसूण मसाला व मीठ घालावे थोडं परतवून झाकण ठेवून एक वाफ आणावी. नंतर आवश्यकतेनुसार पाणी घालावे.

  4. 4
  5. 5

    ५-७ मि. चांगले उखळून घ्यावे.गॅस बंद करावा. हा रस्सा तयार झाला.

  6. 6

    वरून घेण्यासाठी, कांदा, कोथिंबीर, बारीक चिरून घेणे. लिंबाच्या फोडी करून घ्याव्यात.

  7. 7

    आता डीश तयार करावी. प्रथम फरसाण घालावा, त्यावर रस्सा घालावा, वरून कांदा, कोथिंबीर घालावी. ब्रेडबरोबर सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Namita Patil
Namita Patil @namitapatil
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes