मिसळ पाव (misal pav recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#स्नॅक्स साप्ताहिक स्नॅक्स प्लॅनर शुक्रवार
रेसिपी नं 7. #Cooksnap
चमचमीत, झणझणीत काटाकीर्र कटाची कोल्हापुरी मिसळ जिभेला धार काढणारी अशी one pot meal dish म्हणून प्रसिद्ध जगभरात.. याची चव म्हणजे अहाहा ,केवळ स्वर्गसुख.....नेत्रांना सुखावणारी आणि त्याचबरोबर रसनेला तृप्त करणारी ,खमंग मसालेदार चवीची...इतक्या विविध जिन्नसांची सरमिसळ असलेली अशी ही मिसळ,बरं त्यातील प्रत्येक जो जिन्नस आपण वापरतो त्याची स्वतःची अशी खास चव आहे,मसाल्यांची देखील खास चव आहे..स्वतःची खास ओळख आहे...असे असून देखील हे सर्व जिन्नस एकत्र केले की प्रत्येक पदार्थ स्वतःची चव add करत जातो आणि एकरूप होत होत मग तयार होते भन्नाट चवीची मिसळ.😋🔥...आहे की नाही विविधतेत एकता....Unity in diversity....ज्यांनी या पदार्थाला जन्म दिलाय ती व्यक्ती म्हणजेच शाहू महाराजांना शतकोटी प्रणाम🙏🙏
तर असे हे आपले अस्सल मातीतले पदार्थ आपल्याला जगवतात त्याचबरोबर कसे एकरूपतेने जगायचे हे ही कळत नकळत शिकवत असतात ...
माझी मैत्रीण शितल राऊत हिची मिसळपावची रेसिपी मी cook snap केली आहे.. शितल अतिशय उत्कृष्ट खमंग अशी ही मिसळ चवीला झाली होती आणि सगळ्यांना खूप आवडली. Thank you so much Shital for this yummilicious recipe 😍😋🌹❤️
रसरशीत तांबडा बुंद झणझणीत कटाचा रस्सा, मटकीची उसळ त्यात सुखनैव बुडलेले फरसाण वरून पेरलेला कांदा आणि कोथिंबीर शेजारी लिंबाची फोड आणि सोबत लादी पाव..अहाहा.. हाच तो पृथ्वीवरचा स्वर्ग ...चला तर मग या स्वर्गाची सैर करूया..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३०-३५ मिनीटे
5 जणांना
  1. 1 टेबलस्पूनमोहरी
  2. 400 ग्राममोड आलेली मटकी
  3. 1 टेबलस्पूनहळद
  4. 800 मिलिलिटर पाणी मटकी वाफावण्यासाठी
  5. 4मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून
  6. 3मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून
  7. 4 टेबलस्पूनमिसळ मसाला
  8. 1 टेबलस्पूनकांदा लसूण मसाला (झणझणीत करण्यासाठी-ऑप्शनल)
  9. 1 कपबारीक चिरलेली कोथिंबीर
  10. चवीनुसारमीठ
  11. 2मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे
  12. गरजेनुसार फरसाण
  13. बटाट्याची साधी पीवळी भाजी (4 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे मॅश करून थोडं मीठ आणि हळद घालून तेलावर परतुन घ्या)
  14. बारीक चिरलेली कोथिंबीर
  15. 4-5 टेबलस्पूनतेल
  16. 1 टेबलस्पूनमोहरी
  17. 1 टेबलस्पूनआलं-लसूण पेस्ट

कुकिंग सूचना

३०-३५ मिनीटे
  1. 1

    प्रथम मटकीला मोड आणून घ्या. आता मिक्सरच्या भांड्यात टोमॅटो कांदा आलं लसूण यांचे पेस्ट करून घ्या.

  2. 2

    आता कुकरमध्ये तेल घालून त्यावर वरील पेस्ट परतून घ्या आणि मग त्यात कांदा लसूण मसाला मिसळ मसाला थोडे हवे असल्यास लाल तिखट घालून मिश्रण व्यवस्थित परता थोडी एक चमचा साखर घालून परत मिश्रण व्यवस्थित परतून एक वाफ काढून घ्या.. थोडी कोथिंबीर देखील घाला. आता या मिश्रणात मोड आलेली मटकी घाला आणि व्यवस्थित परतून घ्या.

  3. 3

    नंतर आपल्याला हवे असेल तेवढे गरम पाणी तर्रीसाठी उसळीमध्ये घालावे. चवीनुसार मीठ उसळ व्यवस्थित ढवळून घ्यावी. नंतर कुकरचे झाकण लावून तीन शिट्ट्या कराव्यात. अशाप्रकारे झाली आपली उसळ तयार.. या उसळी वरची तर्री बाजूला काढून ठेवावी.

  4. 4

    कुकरचे झाकण पडले की एका प्लेटमध्ये बटाट्याची भाजी,त्यावर उसळ, त्यावर तर्री, फरसाण, बारीक चिरलेला कांदा,कोथिंबीर पेरून सोबत लिंबाची फोड,काकडीचे तुकडे, दही,ताक आणि लादी पाव देऊन झणझणीत मिसळपाव सर्व्ह करावा.

  5. 5
  6. 6
  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

Similar Recipes