पंजाबी चिकन (punjabi chiken recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962

#GA4 #week15 #chicken चिकन मधुन भरपुर प्रमाणात शरीराला प्रोटीन मिळते नॉनवेज खाणाऱ्यांची चिकनची कोणतीही डिश आवडीचीच असते आज मी पंजाबी चिकन कसे बनवायचे ते तुम्हाला सांगते चला बघुया

पंजाबी चिकन (punjabi chiken recipe in marathi)

#GA4 #week15 #chicken चिकन मधुन भरपुर प्रमाणात शरीराला प्रोटीन मिळते नॉनवेज खाणाऱ्यांची चिकनची कोणतीही डिश आवडीचीच असते आज मी पंजाबी चिकन कसे बनवायचे ते तुम्हाला सांगते चला बघुया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2- 1 तास
3-4 व्यक्तिसाठी
  1. 1 किलोचिकन
  2. 4कांदे
  3. 2टोमॅटो
  4. 1 टेबलस्पुनधणे
  5. 1/2 टेबलस्पुनजीरे
  6. 1दालचिनीचा मोठा तुकडा
  7. 4-5मिरीदाणे
  8. 1/2 टीस्पूनहिंग पावडर
  9. 3-4 तमालपत्रे
  10. 2 इंचआले+7-8 लसुण पाकळ्यांची जाडसर पेस्ट
  11. 1/4 टीस्पूनहळद
  12. 1-2 टेबलस्पुनतिखट
  13. 1 टेबलस्पुनकाश्मिरी तिखट
  14. 1-2 टेबलस्पुनचिरलेली कोथिंबिर
  15. चविनुसारमीठ
  16. 1-2 टेबलस्पुनतेल
  17. फोडणीचे खडे मसाले 1 दालचिनीचा तुकडा
  18. 1 टीस्पूनजीरे
  19. 4 हिरव्या वेलच्या
  20. 5-6 मिरीचे दाणे
  21. डेकोरेशन साठी कांदा टोमॅटो लिंबाच्या चकत्या
  22. 1हिरवी मिरची

कुकिंग सूचना

1/2- 1 तास
  1. 1

    चिकन बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य डिश मध्ये काढुन ठेवा खडे मसाले ही डिशमध्ये काढुन ठेवा

  2. 2

    खडे मसाले गरम पॅन मध्ये थोडे परतुन काढुन थंड करून नंतर त्यांची पावडर बनवुन ठेवा

  3. 3

    आल लसुणाची ही जाडसर पेस्ट करून ठेवा

  4. 4

    कांदे काही उभे चिरून व काही बारीक चिरून ठेवा टोमॅटो बारीक चिरून ठेवा चिकन2-3 वेळा स्वच्छ धुवुन चिकनला आललसुण पेस्ट व हळद लावुन 1/2 तास ठेवा

  5. 5

    मोठ्या कुकरमध्ये तेल गरम झाल्यावर खडे मसाले टाकुन परता त्यात आललसुण पेस्ट व चिरलेले कांदे मिरची उभी चिरून परतुन घ्या नंतर त्यात हळद तिखट काश्मिरी तिखट टाकुन परता त्यातच चिरलेले टोमॅटो टाकुन परता

  6. 6

    टोमॅटो परतुन थोडा वेळ झाकण ठेवुन शिजवा त्यात चिकन टाकुन चांगले परतुन घ्या

  7. 7

    चिकन परतल्यावर कोथिंबिर व खडा मसाल्याची तयार केलेली पावडर टाकुन परता

  8. 8

    आवश्यक तेवढे गरमपाणी व मीठ टाकुन झाकण ठेवुन शिजवा

  9. 9

    तयार पंजाबी चिकन प्लेट मध्ये घेऊन त्यावर बारीक चिरलेली कोथिंबिर पसरवा सोबत कांदा टोमॅटो लिंबाच्या चकत्यांनी पंजाबीचिकन डेकोरेट करा व सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
रोजी

टिप्पण्या (2)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
धन्यवाद अरुणादिदी, प्रांजल🙏

Similar Recipes