चिकन सूप (chicken soup recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#hs चिकन चे सुप पावसाळा व थंडीतील ऐक हेल्दी ( काढा ) च चिकन सुप मध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन, मिनरले भरपुर प्रमाण असते चिकन मध्ये प्रोटीन भरपुर असल्याने शरीराला उर्जा व शाक्ति मिळते. रोग प्रतिकार क्षमता वाढते. त्यातील अमीनो ऍसिडमुळे पोटाच्या तक्रारी दुर होतात. वजन कमी करायला मदत होते. ब्लड प्रेशर कंट्रोल करते. कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करते . चला तर असे हेल्दी चिकन सुपची रेसिपी बघुया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
२ जणांसाठी
  1. 1 टीस्पूनजीरे
  2. 1/2 टीस्पूनहळद
  3. १०-१२ कडिपत्त्याची पाने
  4. 1 टीस्पूनआल लसुण ८
  5. 2तमालपत्र
  6. 1 टीस्पूनजीरे
  7. 2दालचिनीचे तुकडे
  8. १०-१२ मिरे
  9. 2-4 लवंगा
  10. 1चक्रीफुल
  11. 2वेलची
  12. चविनुसारमीठ
  13. 2 टेबलस्पुनतेल
  14. 1लिंबाची फोड
  15. 2कांदे
  16. १५-२० लसुण पाकळ्या
  17. 1 इंचआल
  18. १०० ग्रॅम चिकन
  19. 2-4 टेबलस्पुन कोथिंबिर

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    चिकन सुप साठी लागणारे साहित्य काढुन ठेवा कांदे चिरून ठेवा

  2. 2

    लसुण आले जीरे कोथिंबिरची पेस्ट करून घ्या

  3. 3

    चिकन स्वच्छ धुवुन चिकनला हळद व आपण तयार केलेली कोथिंबिरीची पेस्ट चोळुन २० मिनिटे ठेवा

  4. 4

    मोठ्या कुकरमध्ये तेल गरम झाल्यावर त्यात जीरे, कडिपत्ता, सर्व खडे मसाले टाकुन परता नंतर त्यात कांदा व आललसुण पेस्ट टाकुन कांदा शिजेपर्यत परतत रहा

  5. 5

    नंतर त्यात मॅरिनेट केलेले चिकन हाय गॅस वर २-३ मिनिटे सतत चांगले परतुन घ्या

  6. 6

    नंतर चिकनमध्ये ४-५ कप गरम पाणी व मीठ टाकुन झाकण लावुन (शिट्टी न लावता) स्लो गॅसवर १/२ तास शिजवा आपले चिकन सुप रेडी

  7. 7

    सुप बाउल मध्ये चिकन सुप ओतुन त्यावर कोथिंबीर चिकन चे लेग पिस तसेच लिंबाची फोड देऊन सर्व्ह करा आल, लसुण, कडिपत्याच्या पानांनी डेकोरेट करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

टिप्पण्या

Similar Recipes