गव्हाची / दलियाची खीर (daliya kheer recipe in marathi)

Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies

#GA4
#week15
#Jaggery
गव्हाचा रवा म्हणजे दलिया.याची खीर उत्तम होते..
टेस्टी अणि हेल्दी. पोटभरीचा नाश्त्याचा प्रकार आहे हा. गूळ, सुकामेवा घालून केलेली ही पारंपारिक खीर लहान मोठ्यांना सर्वानाच खूप आवडेल अशी ही पौष्टिक पर्वणीच जणू.

गव्हाची / दलियाची खीर (daliya kheer recipe in marathi)

#GA4
#week15
#Jaggery
गव्हाचा रवा म्हणजे दलिया.याची खीर उत्तम होते..
टेस्टी अणि हेल्दी. पोटभरीचा नाश्त्याचा प्रकार आहे हा. गूळ, सुकामेवा घालून केलेली ही पारंपारिक खीर लहान मोठ्यांना सर्वानाच खूप आवडेल अशी ही पौष्टिक पर्वणीच जणू.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
४ सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीगव्हाची भरड/ दलिया
  2. 1 वाटीखिसलेला गुळ
  3. 1/2 कपओल्या नारळाचा चव
  4. 1 टीस्पूनसुंठ पूड
  5. 1 टीस्पूनवेलची पूड
  6. 1 टीस्पूनमीठ
  7. 1/2 कपमिक्स ड्रायफ्रूट
  8. 1 वाटिदुध
  9. पाणी आवश्यकतेनुसार

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    गव्हाचा रवा म्हणजे दलिया. तयार दलिया किराणा दुकानात मिळतो. तो घ्या व कढईत घालून मंद आचेवर भाजून घ्या.

  2. 2

    नंतर कूकरच्या भांड्यात दलिया व याच्या दुप्पट पाणी घालून कूकर मध्ये मंद आचेवर 3 शिट्ट्या करून घ्यावे.

  3. 3

    आता कढईत चमचाभर तूप गरम करून त्यात वेलची, लवंग व कूकर मध्ये शिजवून घेतलेले दलिया चे मिश्रण एकत्र घोटून घ्या.

  4. 4

    गूळ बारीक करून घ्या. दुसर्‍या गॅसवर दूध व पाणी एकत्र उकळायला ठेवा.

  5. 5

    मग या मिश्रणात गूळ,वेलची पूड, सुंठ पूड, ड्रायफृट, मीठ व नारळाचा चव घालून मिश्रण एकजीव करा.

  6. 6

    यामध्ये उकळून घेतलेले दूध-पाणी घालून खीर रटरट शिजवून घ्या.शिजवताना पुरेसं पाणी घाला नाहीतर मिश्रण फार घट्ट होतं.

  7. 7

    गरमागरम दूध व साजुक तुप घालून खीर सर्व्ह करावी.पारंपारिक व पौष्टिक गव्हाची खीर तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies
रोजी
Follow to learn Awesome Delicacies to bring sweetness to your life n your loved ones|Homebaker|Author|foodblogger|Creative||vegetarian| |Food Photography | |Love for Cooking baking|
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes