भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)

Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
Vashi

#लंच
साप्ताहिक रेसिपी

भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)

#लंच
साप्ताहिक रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30  मिनिट
2 व्यक्ती साठी
  1. 250 ग्रामभेंडी
  2. 1/2 कपबेसन
  3. 1कांदा
  4. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  5. 1 टेबलस्पूनधने पावडर
  6. 1 टेबलस्पूनजीरे पावडर
  7. 1/4 टेबलस्पूनआमचूर पावडर
  8. 1/2 टेबलस्पूनहळद
  9. 1/2 टेबलस्पूनगरम मसाला
  10. 4 टेबलस्पूनतेल
  11. 1 टेबलस्पूनमीठ
  12. 1/4 टेबलस्पूनहिंग

कुकिंग सूचना

30  मिनिट
  1. 1

    भेंडी स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून उभी चिरून घेणे. कांदा चिरून घ्यावा.

  2. 2

    चिरलेल्या भेंडीत गरम मसाला सोडून सर्व मसाले व मीठ लावून मिसळून दहा मिनिट बाजूला ठेवावे.

  3. 3

    गॅसवर पॅनमध्ये मध्यम आचेवर बेसन भाजून घ्यावे.

  4. 4

    गॅसवर मध्यम आचेवर पॅन मध्ये तेल घालून त्यात जीरे आणि हिंग घालावा. त्यात कांदा घालून परतून घ्यावा.कांदा लालसर झाल्यावर त्यात मसाले लावलेली भेंडी घालून परतून घ्यावी. मंद गॅसवर दहा ते पंधरा मिनिटे भेंडी शिजेपर्यंत ढवळत राहावे.

  5. 5

    भेंडी शिजल्यावर त्यात भाजून ठेवलेले बेसन थोडे थोडे घालावे. बेसन घालून झाल्यावर पाच मिनिटे परतून घ्यावे. कोथिंबीर घालून भेंडी मसाला चपाती किंवा भाता बरोबर सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
रोजी
Vashi
मला पदार्थ बनवायला आणि खिलवायला आवडते.
पुढे वाचा

Similar Recipes