भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)

Shweta Khode Thengadi
Shweta Khode Thengadi @cook_24735658
Boisar, Palghar

#cpm4
#रेसिपी मॅगझिन
#भेंडी मसाला
सगळ्यांच्या आवडीची भाजी.. भेंडी मसाला अतिशय चविष्ट आणि करायलाही सोपी पाहुयात रेसिपी....

भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)

#cpm4
#रेसिपी मॅगझिन
#भेंडी मसाला
सगळ्यांच्या आवडीची भाजी.. भेंडी मसाला अतिशय चविष्ट आणि करायलाही सोपी पाहुयात रेसिपी....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मी.
4 सर्व्हिंग
  1. 1/2 किलोभेंडी
  2. 2 टेबलस्पूनभाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
  3. 2 टेबलस्पूनभाजलेले तिळाचा कूट
  4. 2कांदे
  5. 2 टेबलस्पूनआल लसूण मिरची पेस्ट
  6. 1 टेबलस्पूनघाटी मसाला
  7. 2 टीस्पूनलाल तिखट
  8. 1 टीस्पूनहळद
  9. 1/2 टीस्पूनजिर/मोहरी
  10. 2 टीस्पूनगरम मसाला
  11. 2 टीस्पूनधने पावडर
  12. 1 टीस्पूनआमचूर पावडर
  13. मीठ चवीनुसार
  14. तेल अंदाजे

कुकिंग सूचना

30 मी.
  1. 1

    सर्वप्रथम भेंडी स्वच्छ धुवून पुसून घ्या. भेंडीचे दोन काप करून त्याच्यामध्ये काप दया.मसाला भरण्यासाठी.

  2. 2

    शेंगदाणा, तिळाचा कुट आलं लसूण मिरची पेस्ट,धने पावडर, आमचूर पावडर, घाटी मसाला, लाल तिखट गरम मसाला, गूळ, चवीनुसार मीठ एकत्रित करून घ्या.

  3. 3

    तयार मसाला काप दिलेल्या भेंडीमध्ये भरून घ्या.

  4. 4

    एका कढाईत तेल गरम करून त्यामध्ये जिर मोहरी ची फोडणी करा. त्यात बारीक चिरलेला कांदा घालून लालसर होईपर्यंत परतून घ्या मग त्यात आले लसूण मिरची पेस्ट घाला. हळद, भेंडी त भरतानाचा उरलेला मसाला घालून छान परतून घ्या एकेक करून मसाला भरलेली भेंडी घालून हलक्या हाताने मिक्स करून झाकण ठेवा.10 मी.बारीक गॅस वर भेंडी मसाला शिजवून घ्या.

  5. 5

    मस्त तयार भेंडी मसाला वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shweta Khode Thengadi
Shweta Khode Thengadi @cook_24735658
रोजी
Boisar, Palghar

टिप्पण्या (7)

Similar Recipes