नारळाच्या दुधातले दडपे पोहे😋😋 (naradachya dudhatle dapde pohe recipe in marathi)

Megha Jamadade
Megha Jamadade @meghaj_corner85
Almere, Netherlands

#ब्रेकफास्ट
दडपे पोहे माझा अत्यंत आवडीचा पदार्थ..आमच्या घरात नेहमी केला जाणारा पदार्थ..ही रेसिपी माझ्या आज्जी ची आहे...अमाच्याघरात दडपे पोहे बनवले की ती सगळ्यांना आवर्जून खायला बोलवायची..😁😁 जेव्हा जेव्हा मी दडपे पोहे बनवते तेव्हा तेव्हा तिची आठवण येते...माझी आज्जी सुगरण होती...😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५मिन
४ लोक
  1. 2 कपपातळ किंवा मध्यम पोहे
  2. 1/2 कपनारळाचं दूध किंवा नारळाचं पाणी
  3. 1 कपकिसलेला ओला नारळ
  4. 1 इंचआले
  5. 3मिरच्या
  6. 1मोठा कांदा
  7. कोथिंबीर, लिंबू, मीठ चवीनुसार, साखर चीमुटभर.
  8. 1/4 कपशेंगदाणे
  9. फोडणीसाठी तेल

कुकिंग सूचना

१५मिन
  1. 1

    पोहे स्वच्छ करून घेणे...त्यात नारळाचं दूध किंवा पाणी घालावे..किसलेला ओला नारळ घालावा..कांदा बारीक चिरून घालावा...कोथिंबीर आणि मिरची ही घालावी..मी कधी कधी काकडी खिसून ही घालते पण आज नाही घातली...

  2. 2

    आता एकीकडे फोडणी पात्र घेऊन त्यात तेल गरम करून शेंगदाणे घालावेत..ते खरपूस भाजले की आले आणि साखर घालून ती फोडणी पोह्यांवर घालवी...आणि ते पोहे एका प्लेट खाली दडपून ठेवावे.

  3. 3

    .हे पोहे १५ मिन दडपून ठेवतात सगळं मिश्रण पोह्यांमध्ये छान मुरावे म्हणून...मुरल्यावर मीठ घालून मिक्स करावे आणि खाण्यासाठी तयार...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Megha Jamadade
Megha Jamadade @meghaj_corner85
रोजी
Almere, Netherlands
"Cooking with love provides food for the soul.."
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes